ETV Bharat / state

वसईतून मुंबईसाठी दारू वाहतूक; 38 जणांवर कारवाई

author img

By

Published : May 21, 2020, 9:22 PM IST

आतापर्यंत ३८ जणांवर महाराष्ट्र दारू अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ज्यात अत्यावश्यक सेवेत वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका व मुंबई महापालिकेच्या बसचा समावेश आहे.

वसईतून मुंबईसाठी दारू वाहतूक; 38 जणांवर कारवाई
वसईतून मुंबईसाठी दारू वाहतूक; 38 जणांवर कारवाई

पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दारूची दुकाने बंद असली तरी वसई विरारमध्ये अजूनही मद्यविक्री सुरू आहे. त्यामुळे मुंबईतल्या मद्यपींचा कल सध्या वसई विरारकडे वळला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांसाठी वसई- विरार सध्या दारूचा प्रमुख हॉटस्पॉट बनला आहे. येथून बेकायदेशीररित्या वाहतूक करून दारू मुंबईत नेली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची चोरट्या वाहतुकीवर करडी नजर असून वसई पोलिसांकडून करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आतापर्यंत ३८ जणांवर महाराष्ट्र दारू अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ज्यात अत्यावश्यक सेवेत वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका व मुंबई महापालिकेच्या बसचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत पालघरमध्ये दारुविक्री सुरू राहणार आहे. त्यामुळे आता दारूच्या छुप्या तस्करीवर पोलिसांची करडी नजर आहे.

बाईट- विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक , वसई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.