ETV Bharat / state

पालघरच्या समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात पर्ससीन ट्रॉलर्सची अनधिकृत मासेमारी - trolors

गेल्या अनेक दिवसांपासून वडराई, डहाणू भागातील कव क्षेत्रात शेकडोंच्या संख्येने आलेल्या ट्रॉलर्सनी स्थानिक मच्छीमारांनी जतन करून ठेवलेले मत्स्यसाठे ओरबाडून नेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.

समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात पर्ससीन ट्रॉलर्सची अनधिकृत मासेमारी
author img

By

Published : Feb 23, 2019, 9:49 PM IST

पालघर - समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात घुसून पर्ससीन नेटधारक ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वडराई, डहाणू भागातील कव क्षेत्रात शेकडोंच्या संख्येने आलेल्या ट्रॉलर्सनी स्थानिक मच्छीमारांनी जतन करून ठेवलेले मत्स्यसाठे ओरबाडून नेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. याविरोधात कारवाई करण्यात मत्स्यव्यवसाय विभाग असमर्थ ठरत आहे.

समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात पर्ससीन ट्रॉलर्सची अनधिकृत मासेमारी
समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात पर्ससीन ट्रॉलर्सची अनधिकृत मासेमारी

समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात पर्ससीन ट्रॉलर्सची अनधिकृत मासेमारी

दिवसेंदिवस समुद्रातील मत्स्यसाठ्यांचे कमी होणाऱ्या प्रमाणाला पर्ससीन नेट,एलईडीद्वारे होणारी मासेमारी जबाबदार असल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे. त्यानंतर कोकणातील सर्वच किनारपट्टीवर ५ फेब्रुवारी २०१६ पासून १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीसाठी पर्ससीन मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. पर्ससीन मासेमारीला फक्त १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या ४ महिन्याच्या कालावधी दरम्यानच मासेमारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मासेमारी परवाने घेऊन हे पर्ससीनधारक समुद्रात धुमाकूळ घालत आहेत. महत्त्वाचे म्हणजे परवानाधारक पर्ससीन ट्रॉलर्स पेक्षा तिप्पट पटीने अनधिकृत पर्ससीनधारक ट्रॉलर्स फिरत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात मत्स्यव्यवसाय खाते अपयशी ठरत आहे.

अनधिकृत ट्रॉलर्स मालकांकडून मोठे आर्थिक पॅकेज संबंधित विभागाला वेळोवेळी पोचते केले जात असल्याचा आरोप मच्छिमार संघटनांनी केला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही असे मच्छिमार संघटनेचे म्हणणे आहे.
वडराईच्या समुद्रात १०.५ नॉटिकल क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या साईराम या ट्रॉलर्सवर २० डिसेंबर रोजी मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत त्यांना सातपाटीच्या किनाऱ्यावर आणले होते. तहसीलदारांनी ५ हजारांचा दंड आणि परवाना रद्द करण्याचे आदेश देऊन हे ट्रॉलर्स सोडण्यात आले होते. हे कळल्यानंतर संतप्त झालेल्या मच्छीमारांनी परवाना अधिकाऱ्यासोबत समुद्रात जाऊन तो ट्रॉलर्स पुन्हा किनाऱ्यावर आणला होता.

undefined

अशा बेकायदेशीर ट्रॉलर्सवर कारवाई करण्याबाबत कायद्यात कठोर बदल करण्यात यावेत अशी, मागणी मुख्यमंत्र्यांच्या सातपाटीच्या भेटी दरम्यान मच्छीमारांनी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण कोस्टगार्डला अशा ट्रॉलर्सवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात येतील असे जाहिर आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही त्या आश्वासनाचे कार्यवाहीत रूपांतर झाले नसल्याने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त दिनेश पाटील यांना मच्छीमारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
ठाणे आणि पालघर या २ जिल्ह्यांसाठी एकच गस्ती नौका आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या समुद्रात मर्यादित स्टाफच्या मदतीने या ट्रॉलर्सवर कारवाई करण्यास त्यांना मर्यादा येत आहेत.

याचा फायदा उचलत सध्या वडराई, एडवण, डहाणू भागात शेकडोंच्या संख्येने ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरू आहे. या ट्रॉलर्सकडून स्थानिक मच्छीमारांच्या बोटींना बुडवण्याचा दम दिला जात असल्याने छोटे मच्छिमार दहशतीच्या वातावरणात समुद्रात जात आहेत. मच्छिमारांनी पर्ससीन ट्रॉलर्सबाबत मला माहिती दिल्यानंतर मी गस्ती नौकेला वडराई भागात तैनात केले असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. अशी माहिती दिनेश पाटील यांनी दिली आहे.

Intro:समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात पर्ससीन नेटधारक ट्रॉलर्सचा धुमाकूळ: कारवाई करण्यास मत्स्यव्यवसाय विभाग असमर्थBody:समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात पर्ससीन नेटधारक ट्रॉलर्सचा धुमाकूळ: कारवाई करण्यास मत्स्यव्यवसाय विभाग असमर्थ

नमित पाटील,
पालघर, दि.23/2/2019

समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात घुसून पर्ससीन नेटधारक ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरूच असून गेल्या अनेक दिवसांपासून वडराई, डहाणू भागातील कव क्षेत्रात शेकडोंच्या संख्येने आलेल्या ट्रॉलर्सनी येथील स्थानिक मच्छीमारांनी जतन करून ठेवलेले मत्स्यसाठे ओरबाडून नेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. यावरविरोधात कारवाई करणारे मत्स्यव्यवसाय विभाग मात्र ही अनधिकृत मासेमारी रोखण्यास असमर्थ ठरत आहेत.

दिवसेंदिवस समुद्रातील मत्स्यसाठ्यांचे कमी होणाऱ्या प्रमाणाला पर्ससीन नेट,एलईडी द्वारे होणारी मासेमारी जबाबदार असल्याचे वास्तव समोर येऊ लागल्यानंतर कोकणातील सर्वच किनारपट्टीवर 5 फेब्रुवारी 2016 पासून 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या कालावधीसाठी पर्ससीन मासेमारीला बंदी घालण्यात आलेली आहे. पर्ससीन मासेमारीला फक्त 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर चार महिन्याच्या कालावधी दरम्यानच मासेमारी करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. असे असताना मासेमारी परवाने घेऊन हे पर्ससीनधारक समुद्रात धुमाकूळ घालीत आहेत. महत्वाचे म्हणजे परवानाधारक पर्ससीन ट्रॉलर्स पेक्षा तिप्पट पटीने अनधिकृत पर्ससीनधारक ट्रॉलर्स फिरत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात मत्स्यव्यवसाय खाते आजही अपयशी ठरत आहे. अनधिकृत ट्रॉलर्स मालकांकडून मोठे आर्थिक पॅकेज संबंधित विभागाला वेळोवेळी पोचते केले जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप मच्छिमार संघटनांकडून केले जात आहेत.

वडराई गावाच्या समोरील समुद्रात 10.5 नॉटिकल क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या साई राम ह्या ट्रॉलर्स वर 20 डिसेंबर रोजी मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करीत त्यांना सातपाटीच्या किनाऱ्यावर आणले होते.तहसीलदारांनी 5 हजारचा दंड व परवाना रद्द करण्याचे आदेश देऊन ही ट्रॉलर्स सोडण्यात आल्याचे कळल्या नंतर संतप्त झालेल्या मच्छीमारांनी परवाना अधिकाऱ्या सोबत समुद्रात जात तो ट्रॉलर्स पुन्हा किनाऱ्यावर आणला होता. अश्या बेकायदेशीर ट्रॉलर्स वर कारवाई करण्याबाबत कायद्यात कठोर बदल करण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्या सातपाटी च्या भेटी दरम्यान मच्छीमारांनी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण कोस्टगार्ड ला अश्या ट्रॉलर्सवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात येतील असे जाहीर आश्वासन दिले होते.मात्र अजूनही त्या आश्वासनाचे कार्यवाहीत रूपांतर झाले नसल्याने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त दिनेश पाटील यांना मच्छीमारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ठाणे आणि पालघर ह्या दोन जिल्ह्यासाठी एकच गस्ती नौका असल्याने एवढ्या मोठ्या समुद्रात एकाच गस्ती नौकेने मर्यादित स्टाफ च्या मदतीने ह्या ट्रॉलर्सवर कारवाई करण्यास त्यांना मर्यादा येत आहेत.ह्याचा फायदा उचलीत सध्या वडराई, एडवण, डहाणू भागात शेकडोंच्या संख्येने ट्रॉलर्स चा धुमाकूळ सुरू असून दहशत निर्माण करून स्थानिक मच्छीमाराच्या बोटींना आपल्या बोटीच्या धडका देत बोटी बुडविण्याचा दम दिला जात असल्याने छोटे मच्छिमार दहशतीच्या वातावरणात समुद्रात जात आहेत.

मच्छिमारांनी पर्ससीन ट्रॉलर्स बाबत मला माहिती दिल्या नंतर मी गस्ती नौकेला वड राई भागात तैनात केली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत
- दिनेश पाटील,सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त.पालघर-ठाणे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.