ETV Bharat / state

आयडीबीआयचे एटीएम फोडून ९ लाख लंपास; ढिसाळ सुरक्षा असल्याने ठेवीदारांमध्ये संताप

वाडा तालुक्यातील वाडा-भिवंडी महामार्गावरील कुडूस हद्दीत उत्सव काॅम्पलेक्समध्ये आयडीबीआय बँक, टिजेएसबी बँक व एक प्लायऊड सेंटर आहे. तळमजल्यावर आयडीबीआयची बँक आणि त्याच्या शेजारी एटीएम मशीन आहे.

चोरी झालेले हेच एटीएम.
author img

By

Published : Jun 14, 2019, 10:12 PM IST

Updated : Jun 15, 2019, 12:00 PM IST

पालघर (वाडा) - तालुक्यातील कुडूस येथील ग्रामपंचायत हद्दीतील आयडीबीआय बँकेच्या एटीएम मशिनवर दरोडा घालत दरोडेखोरांनी ९ लाख ५९ हजार रूपयांची रोकड चोरुन नेली आहे. हा धाडसी दरोडा १३ जूनला पहाटे ३ वाजता घडला. दरोड्याची घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकाराला बँकेची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था कारणीभूत असल्याचा आरोप व्यापारी व बँकेच्या ठेवीदारांनी केली आहे.

आयडीबीआयचे एटीएम फोडून 9 लाख लंपास; ठेवीदार संतापले

वाडा तालुक्यातील वाडा-भिवंडी महामार्गावरील कुडूस हद्दीत महामार्गाजवळ उत्सव काॅम्पलेक्समध्ये आयडीबीआय बँक, टिजेएसबी बँक व एक प्लाऊड सेंटर आहे. तळमजल्यावर आयडीबीआयची बँक आणि त्याच्या शेजारी एटीएम मशीन आहे. चोरट्यांनी १३ जूनला पहाटेच्या सुमारास गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून ९ लाख ५० हजार रूपये लंपास केले. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीमधून ओळख पटू नये, म्हणून तोंडाला रुमाल बांधला होता. एवढेच नाहीतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेचे कनेक्शनही तोडले होते. या घटनेवेळी बँकेचा सुरक्षा रक्षक घटनास्थळी उपस्थित नव्हता.

दरोड्याला बँकांचा निष्काळजीपणा कारणीभूत-

आयडीबीआय व टीजेएसबी या दोन्ही बँकांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही. हा येथील बँकांचा निष्काळजीपणा आहे. ठेवीदार मोठ्या प्रमाणात बँकेत ठेवी ठेवत असतो. सामान्य नागरिकांसोबत व्यापारीवर्गाची गुंतवणूक मोठी असते. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे. तसेच नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे, अशी गरज व्यापारी असोसिएशन अध्यक्ष व प्लायऊड दुकानाचे मालक हर्षल देसले यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली. दरोड्याचा तपास पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे करीत आहेत.

Intro:गॅस कटरने एटीएम फोडून 9 लाख 59 हजार लुटले
बँकेकडे सुरक्षा यंञणा नाही.
ठेवी कुणाच्या भरवशावर ठेवायच्या - ग्राहक जनतेचा सवाल

पालघर (वाडा) - संतोष पाटील

वाडा तालुक्यातील कुडूस इथल्या ग्रामपंचायत हद्दीतील आयडीबीआय या बँकेच्या एटीएम मशिनवर दरोडा घालत 9 लाख 59 हजार रूपयांची रोकड पळून नेली आहे.हा धाडसी दरोडा 13 जुनच्या राञी 3 वाजता घडला.हा प्रकार तेथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे. या प्रकारात बँकेची सुरक्षा व्यवस्था कारणीभूत असल्याचे व पोलिसांनी गस्ती वाढविण्याची मागणी व्यापारीकरण, बँकेचे ठेवीदारांनी केली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असुन या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे करीत आहेत.

वाडा तालुक्यातील वाडा - भिवंडी महामार्गावरील कुडूस हद्दीत हायवेच्या 50 फुटावर आयडीबीआय बँक,टिजेएसबी बँक व प्लाऊड सेंटर अशी तीन दुकाने उत्सव काँम्पलेक्स मध्ये आहेत.वरच्या मजल्यावर टिजेएसबी तर तळमजल्यावर आयडीबीआयची बँक व त्याचे शेजारी एटीएम मशीन आहे.13 जूनला राञी तुमच्या सुमारास गँस कारच्या सहाय्याने एटीएम तोडून 9 लाख 59 हजार रूपये पळवून पोबारा केला. यावेळी चोरट्यांनी आपण सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद होतोय म्हणून त्यांनी तोंडाला रुमाल आणि सीसीटीव्ही कॅमेरेचे कनेक्शन तोडण्यात आले.
यावेळी बँकेचा सुरक्षा रक्षक नव्हता.
येथील आयडीबीआय व टिजेएसबी या दोन्ही बँकांनी कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा उभी केलेली नाही.हा इथल्या बँकेचा निष्काळजीपणा आहे. ठेवीदार मोठ्या प्रमाणात बँकेत ठेवी ठेवत असतो. सामान्य नागरिकाबरोबरोच व्यापारीवर्गाची गुंतवणूक मोठी असते.या ठेवीची सुरक्षा काय? पोलीसांनी गस्त वाढवली पाहीजे आणि नागरिकांनी सतर्क राहीले पाहीजे असे मत व्यापारी असोसिएशन अध्यक्ष व शेजारी प्लाऊड दुकानाचे मालक हर्षल देसले यांनी यावेळी ईटिव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.
तर याप्रकरणी तपास चालु आहे असे 14 जुन रोजी घटना स्थळाला भेट देणारे जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी आर. सोनावणे यांनी सांगितले Body:2 videos Conclusion:2 videos
Last Updated : Jun 15, 2019, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.