पालघर - कोरोनाच्या वाढत्या प्रभावानंतर पालघरमधील वस्तीगृह व आश्रमशाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एका शिक्षकासह 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आश्रमशाळेतील 37 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता नंडोरे आश्रमशाळेतील एका शिक्षकासह 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तसेच इतर शासकीय विभागांचे वसतिगृहे व खासगी वसतिगृहे 22 मार्च ते पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहता येणार, असे देखील जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.