वसई : वसई-विरार परिसरात शुक्रवारी मुसळधार Heavy rain in vasai virar area पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने वसई-विरारच्या सखल भागात पाणी साचल्याने Water logging in low lying areas vasai virar जनजीवन विस्कळीत heavy rain disrupts traffic and life vasai virar झाले. तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरदेखील पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. Mumbai Ahmedabad highway traffic disrupted
मुसळधार पावसाने उडविली भंबेरी - सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वसईच्या पश्चिम भागातील देवतलाव, बंगली व कार्मलाईट परिसरात पाणी साचले होते. कधीही पाणी न साचणार्या परिसरातदेखील पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली. अजून पुढील एक-दोन दिवस पावसाची मुसळधार हजेरी असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ग्रामीण भागात तानसा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने तसेच मुसळधार पावसाचा जोर न ओसरल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.
भातशेती पाण्याखाली, शेतकरी चिंतेत - मागील 5 ते 6 दिवसांपासून परतीच्या पावसाने कहर केला आहे. अधूनमधून रिमझिम; तर कधी मुसळधार कोसळणार्या पावसामुळे शेतकर्यांत चिंतेचे वातावरण पसरले होते. गुरुवारी मध्यरात्री पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतात साचलेले पाणी लवकर ओसरले नाही तर भातपिक कुजण्याचा धोका संभवतो. त्याचा आर्थिक फटका ग्रामीण भागातील शेतकर्यांना बसू शकतो.
अनधिकृत बांधकामांमुळे पाणी साचले - वसईत अनधिकृत बांधकामांमुळे पाणी साचण्याची समस्या गेल्या एक-दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नैसर्गिक नाल्यावर झालेली अनधिकृत बांधकामे, तसेच शहरातील सांडपाणी वाहून नेणारे छोटेमाठे नालेच अतिक्रमणांमुळे निमुळते होत गेल्याने वसई-विरारवर पुराचे संकट घोंगावू लागले आहे. महापालिकेने 12 करोड रूपये खर्चून निरी व आयआयटी संस्थांनी तयार केलेल्या अहवालावर काय उपाययोजना केल्या त्या अद्याप शासकीय लालफितीतच असल्याने दरवर्षी वसईचा भौगोलिक परिसर ओल्या दुष्काळाचा बळी ठरू लागला आहे.
साचलेल्या पाण्यामुळे वाहतुक व्यवस्था कोलमडली - ग्रामीण भागात यंदा उशिरा झालेल्या भातशेतीसाठी विश्रांतीनंतर सुरू झालेला पाऊस वरदान ठरला असला, तरी आता अवेळी पावसाने भातशेतीवरच विघ्न धरले आहे. आज सकाळपासून पावसाने उसंत न घेता एकच कोसळधार सुरू ठेवल्याने वाहतुकीचा कणा मोडून पडला. वार्यासह पाऊस मुसळधार कोसळत असल्याने महामार्गावरील तसेच वसईतील महामार्गावरील वाहतूक संथ वेगाने सुरू होती. तसेच पावसाचा जोर अद्याप ओसरला नसल्याने वसई तालुक्यावर पुराचे सावट आहे.