ETV Bharat / state

सलग तीन दिवसांच्या पावसामुळे संपूर्ण वसई-विरार शहर जलमय - वसई-विरार पाऊस अपडेट

गेल्यावर्षीही पावसाळ्यात वसई तुंबली होती. यंदाही सलग तीन दिवसांच्या पावसामुळे संपूर्ण वसई-विरार जलमय झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी....

Vasai-Virar Rain
वसई-विरार पाऊस
author img

By

Published : Aug 6, 2020, 11:52 AM IST

पालघर: वसई-विरारमध्ये सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सोमवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातही पूर आले आहेत. वसईतील पाढंरतारा पूल काल पाण्याखाली गेल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे.

गेल्यावर्षीही पावसाळ्यात वसई तुंबली होती. यंदाही सलग तीन दिवसांच्या पावसामुळे संपूर्ण वसई-विरार जलमय झाले आहे. या परिस्थीतीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी....

पावसामुळे अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे शहरात विजेचा लपंडाव सुरू होता. तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून विवा कॉलेज परिसर, तुळींज, आचोळे परिसरातील पाणी ओसरलेले नाही. पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक इमारतींमध्ये पाणी शिरून नुकसानही झालेले आहे. मासवण येथील वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी गेल्याने शहराचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला असून ऐन पावसाळ्यात वसईकरांवर जलसंकट ओढवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.