ETV Bharat / state

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात - पालघर गुन्हे बातमी

कुमार वामन पष्ठे, हे एकात्मिक आदिवासी प्रकल्प डहाणू अंतर्गत येत असलेल्या एम्बुर या आश्रम शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. आश्रम शाळेमध्ये ध्वजस्तंभ व परिसरातील जमिनीवर पेवर ब्लॉक लावण्यासाठी काम सुरू असताना या कामातील उर्वरित बिलाची रक्कम व धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून मुख्याध्यापक पष्टे  याने 10 हजार रुपयांची मागणी केली.

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
author img

By

Published : Nov 14, 2019, 1:12 PM IST

पालघर - दुर्वेस नजीक असलेल्या माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापक 10 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या(एसीबी) जाळ्यात सापडला आहे. कुमार वामन पष्ठे, असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. लाचलुचपत विभागाने या मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

कुमार वामन पष्ठे, हे एकात्मिक आदिवासी प्रकल्प डहाणू अंतर्गत येत असलेल्या एम्बुर या आश्रम शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. आश्रम शाळेमध्ये ध्वजस्तंभ व परिसरातील जमिनीवर पेवर ब्लॉक लावण्यासाठी काम सुरू असताना या कामातील उर्वरित बिलाची रक्कम व धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून मुख्याध्यापक पष्ठे याने 10 हजार रुपयांची मागणी केली.

हेही वाचा - कळवेच्या शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा

या लाचेची मागणी केल्यानंतर ठेकेदाराने संबंधित बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितली. त्या अनुषंगाने बुधवारी पष्ठे यांनी तक्रारदार यांच्याकडून दुपारच्या सुमारास शासकीय आश्रम शाळेच्या शेड क्रमांक 12 मध्ये ही लाच स्वीकारली. त्यावेळी सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापक कुमार पष्ठे याला रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाचे उपअधीक्षक कालगोंडा हेगाजे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.

अशा कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तींनी शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर कार्यालयाला संपर्क करावा. तसेच आपत्कालीन कक्ष क्रमांक 1064 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन उपअधीक्षक कालगोंडा हेगाजे यांनी केले.

हेही वाचा - पालघरातील गणेश कुंड येथे दीपोत्सवानिमित्त आतषबाजी; विलक्षण नजारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी

Intro:आश्रमशाळा मुख्याध्यापकास 10 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
Body:आश्रमशाळा मुख्याध्यापकास 10 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

नमित पाटील,
पालघर, दि.14/11/2019

     पालघर तालुक्यातील दुर्वेस नजीक असलेल्या माध्यमिक आश्रमशाळा एम्बुरचे मुख्याध्यापक कुमार वामन पष्ठे याला दहा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

कुमार वामन पष्ठे हे एकात्मिक आदिवासी प्रकल्प डहाणू अंतर्गत येत असलेल्या एम्बुर या आश्रम शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. आश्रम शाळेमध्ये ध्वजस्तंभ व परिसरातील जमिनीवर पेवर ब्लॉक लावण्यासाठी काम सुरू असताना या कामातील उर्वरित बिलाची रक्कम व धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून मुख्याध्यापक पष्टे याने दहा हजार रुपयांची मागणी केली.

     या लाचेची मागणी केल्यानंतर ठेकेदाराने संबंधित बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितली. त्या अनुषंगाने  बुधवारी पष्टे यांनी तक्रारदार यांच्याकडून दुपारच्या सुमारास शासकीय आश्रम शाळेच्या शेड क्रमांक 12 मध्ये हि लाच स्वीकारली. त्यावेळी सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापक कुमार पष्टे याला रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाचे उपअधीक्षक कालगोंडा हेगाजे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे.

अशा कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तींनी शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर कार्यालयाला संपर्क करावा किंवा आपत्कालीन कक्ष क्रमांक 1 0 6 4 या वर संपर्क करावा असे आवाहन उप अधीक्षक काल गुंडा हे गाजे यांनी या निमित्ताने केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.