ETV Bharat / state

डहाणू नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा, सत्तेतील भाजप नगरसेवकांची मागणी - palghar dahanu latest news

डहाणू नगरपरिषदेत सत्तेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी साडेतीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. तसेच पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसाळे यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत भाजपचे नगराध्यक्ष लव नगरसेवक यांनी डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

dahanu nagarparishad head officer
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा
author img

By

Published : Jan 2, 2021, 2:30 PM IST

पालघर - डहाणू नगरपरिषदेत सत्तेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी साडेतीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. तसेच पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसाळे यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत भाजपचे नगराध्यक्ष लव नगरसेवक यांनी डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अन्यथा सत्ताधारी भाजपकडून आमरण उपोषण करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

सत्ताधारी भाजपचा मुख्याधिकाऱ्यांवर आरोप
डहाणू नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांमध्ये जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा अपहार, सभेचा अवमान करणे, मुख्यालयात न राहणे, सतत गैरहजर राहणे असे अनेक आरोप सत्ताधारी भाजपकडून मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यावर करण्यात आले आहेत. डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या नेतृत्वात उपनगराध्यक्ष तसेच भाजपच्या 18 नगरसेवकांनी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची भेट घेत, मुख्याधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून याबाबत निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सत्तेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी दिला आहे.

हेही वाचा - J&K: पुलवामामधील त्राल बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला, ८ जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.