ETV Bharat / state

विरारचा हार्दीक पाटील ठरला आर्यमॅन; १६ वेळा स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय

दुबई येथे १६ वी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत हार्दिक पाटील यांनी पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. खासकरून विदेशात होणारी हि स्पर्धा खेळाडूंची शारीरीक कसब अजमावून पाहत असते.

हार्दीक पाटील
हार्दीक पाटील
author img

By

Published : Mar 14, 2021, 4:52 PM IST

Updated : Mar 14, 2021, 6:11 PM IST

पालघर/विरार :- देशाची भावी पिढी पब्जीच्या वेडापायी मैदानी खेळ सोडून हॉलीवूड चित्रपटातील सुपरहिरोंपैकी ‘आयर्नमॅन’ला आपला हिरो मानत आहेत. मात्र, विरारचा हार्दिक पाटील याने खऱ्या खुऱ्या आयुष्यातील ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावला आहे. दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आर्यमॅन स्पर्धा जिंकत हार्दिक पाटील तरुणांचे खरेखुरे ‘आयर्नमॅन’ ठरले आहेत. एक नाही दोन नाही तर तब्बल १६ वेळा पाटील यांनी ही स्पर्धा जिंकली आहे.

विरारचा हार्दीक पाटील ठरला आर्यमॅन

१६ वेळा स्पर्धा जिंकणारे पाटील पहिले भारतीय

दुबई येथे १६ वी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत हार्दिक पाटील यांनी पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. खासकरून विदेशात होणारी हि स्पर्धा खेळाडूंची शारीरीक कसब अजमावून पाहत असते. अतिशय खडतर अशी ही स्पर्धा असून त्यात सलग न थांबता स्विमिंग, सायकलिंग व रंनिग करत स्पर्धा पूर्ण करावी लागते. यात पाटील यांनी १.९ किमी स्विमींग, ९० किमी सायकलिंग व २१ किमी रनींग करत ७ तास ३५ मिनीटात हि स्पर्धा पूर्ण केली. आयर्नमॅन या स्पर्धेत हार्दिक पाटील यांनी याअगोदर तब्बल १५ वेळा भारताचा झेंडा साता समुद्रापार फडकावला आहे. आजच्या या कामगिरीने तो भारतातील पालघर जिल्ह्यातील पहिला आयर्नमॅन ठरले आहेच.

Last Updated : Mar 14, 2021, 6:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.