पालघर - अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या मोटारीतून लाखोंचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दतील दापचरी आरटीओ चेक नाका येथे रात्रीच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
13 लाख 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त
पालघर जिल्ह्यातील दापचरी चेक नाक्यावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास संशयित मोटारीची (एम एच 05 डी के 5879) तपासणी केली असता. त्यामधून विविध प्रकारचा गुटखा व सुगंधित सुपारी जप्त आढळली. मोटारीसह एकूण 13 लाख 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तलासरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - प्रत्येक तापाच्या रुग्णांची अँटीजेन टेस्ट करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
हेही वाचा - कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत माथेफिरूने कापली स्वतःची नस