पालघर - वाडा तालुक्यात ४ ऑगस्टला आलेल्या तानसा नदीच्या पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना शासकीय मदतीच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, वाडा प्रांताधिकारी अर्चना कदम, वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे, गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भोईर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, माजी सभापती अरूण गोंड आदी उपस्थित होते.
वाडा तालुक्यात तानसा नदीला पूर आल्याने नदी काठच्या निंबवली, गोराड आणि केळठण भागाला जोरदार तडाखा बसला होता. 200 हून अधिक घरांना या पुराचा फटका बसला होता. त्यामुळे, निंबवली गावातील कृष्णा भोईर यांच्या घरी व शाळेत आपत्तीग्रस्तांची निवाऱ्याची सोय केली होती. या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे तसेच अन्नधान्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे ही मदत त्यांच्यासाठी मोलाची ठरणार आहे.