ETV Bharat / state

विरार पोलिसांनी आवळल्या सोनसाखळी चोरांच्या मुसक्या - पालघर लेटेस्ट न्युज

विरार पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले. १५ दिवसाचे सर्व मार्गातील सीसीटीव्ही तपासले असता. अजय किरण शाह हा संशयावर आढळला. पोलीसांची माहिती सत्य ठरताच अजय किरण शहाला विरार येथे राहत घरी बेड्या ठोकण्यात आल्या.

विरार पोलीस
विरार पोलीस
author img

By

Published : Mar 23, 2021, 10:13 PM IST

विरार (पालघर) - मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्यास विरार पोलिसांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.मागील कित्येक दिवसांपासून सोनसाखळी चोरांचा वसई विरारमध्ये सुळसुळाट सुरू होता. विरार पोलिसांनी या प्रकरणी तपास करून सोनसाखळी चोरट्याला जेरबंद केले आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या १४ गुन्ह्यांची कबुली या आरोपीनी दिली आहे. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ७४ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे.

अशी करण्यात आली कारवाई

विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोराने मागील काही दिवसापासून धुमाकूळ घातला होता. याचीच दखल घेत पोलीसांनी सापळा रचत अजय किरण शाह वय (२१) यासह इतरही आरोपीला अटक केली आहे. शाह व त्याच्या साथीदाराने १४ मार्च रोजी विरार पूर्व गासकोपरी परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी खेचून हे आरोपी फरार झाले होते.या चोरट्यांनी एक नव्हे तर तब्बल १४ जणांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्या होत्या. विरार पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले. १५ दिवसाचे सर्व मार्गातील सीसीटीव्ही तपासले असता. अजय किरण शाह हा संशयावर आढळला. पोलीसांची माहिती सत्य ठरताच अजय किरण शहाला विरार येथे राहत घरी बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र त्याचा साथीदार शंकर हाल्या हा मुख्य आरोपी असल्याचे शाह याने पोलिसांना सांगितले आहे.

इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

शंकर हाल्या आणि किरण शाह या जोडीने विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत आतापर्यत १४ गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गुन्ह्यात वापरले गेलेली ५० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल, ५ लाख २४ हजार ९५० रुपये किंमतीचे १५३.६०० ग्रॅम वजन असणारे सोन्याचे दागिने, असा एकूण ५ लाख ७४ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी हस्तगत केला आहे. शाह याचा दुसरा साथीदार मुख्य आरोपी शंकर हाल्या हा आधीच्या गुन्ह्यात ठाणे तुरुंगात असून त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस सांगितले आहे.

हेही वाचा-फेसबुक मित्राकडून अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून बलात्कार; आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.