ETV Bharat / state

गँगस्टर अख्तर कासबला अटक, पालघर दहशतवादी विरोधी पथकाची कामगिरी - daud ibrahim

दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित असलेल्या कुख्यात अख्तर कासब अली मर्चंटच्या मुसक्या आवळण्यात पालघरच्या दहशतवादी विरोधी पथकाला यश आले आहे.

आरोपीसह पोलीस पथक
आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Feb 27, 2020, 10:55 AM IST

पालघर - दहशतवाद विरोधी पथकाला दाऊद इब्राहिम टोळीशी सबंधित अख्तर कासब अली मर्चंट (वय 56 वर्षे) या कुख्तात गुंडाला पकडण्यात यश आले आहे. अख्तर मर्चंट याच्यावर मुंबई, महाराष्ट्र, गुजरात येथील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मुंबईत त्याने स्वत:ची गँग तयार केली होती. तसेच खंडणी गोळा करणे, अपहरण करून पैसे उकळणे तसेच अंमली पदार्थ (ड्रग) माफीयांशी त्याचे संबंध होते. ठाणे ग्रामीण, मिरारोड, नागपाडा, मूंबई, वसई, विरार, नालासोपारा भागात त्याने दहशत माजवली होती. मात्र, डिसेंबर 2018 पासून तो नेपाळ, बांग्लादेश येथे फरार राहिला होता. बांग्लादेश येथून बनावट पारपत्र (पासपोर्ट) बनवून नैरोबीला जाण्याच्या प्रयत्न फसल्यामुळे तो मुंबईत परत आला होता. मंगळवारी (दि. 25 फेब्रुवारी) रोजी अख्तर कासब अली मर्चंट नालासोपारा पश्चिम येथे येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पालघर दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख मानसिंग पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून त्याला अटक केली आहे.

हेही वाचा - अवैध रेती उत्खननावर सफाळे पोलिसांची कारवाई, 77 लाख 98 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.