ETV Bharat / state

Funeral On Stranger In Palghar : आपल्याच कुटुंबातील बेपत्ता सदस्य समजून अनोळखी व्यक्तीवर अंत्यसंस्कार; मात्र बेपत्ता व्यक्तीही सापडला - Funeral on stranger missing family member

अपघाती मृत्यू झालेल्या अनोळखी व्यक्तीला आपल्याच कुटुंबातील बेपत्ता झालेला सदस्य समजून एका कुटुंबाने अंत्यसंस्कार केले. मात्र, बेपत्ता व्यक्ती सापडल्याने अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती दुसरीच कोणी निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघरमध्ये ही घटना घडली आहे.

Funeral On Stranger In Palghar
रफिक
author img

By

Published : Feb 6, 2023, 6:05 PM IST

Updated : Feb 6, 2023, 9:50 PM IST

पोलीस निरीक्षक नरेश रणधीर माहिती देताना

पालघर : शहरात एक अजबच घटना समोर आली आहे. अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीला आपल्याच कुटुंबातील बेपत्ता झालेला सदस्य समजून एका कुटुंबाने अंत्यसंस्कार केले. मात्र, बेपत्ता व्यक्ती सापडल्याने या अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती दुसरीच कोणी निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. बोईसर रेल्वे स्थानकावर २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजतादरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेसची धडक लागल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात २० जानेवारीला शवविच्छेदन करण्यात आले.

काय आहे प्रकरण : पालघर लोहमार्ग पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला. याच अनुषंगाने या व्यक्तीची छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यात आली. यादरम्यान एका व्यक्तीने पोलिस ठाण्यात येऊन छायाचित्रांवरून ओळख पटवून संबंधित मृत व्यक्ती आपला भाऊ रफिक हा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने याबाबत कुटुंबियांना माहिती दिली. त्यांनीही तारापूर येथे जाऊन मृत व्यक्तीची ओळख पटवून हा आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे पालघर येथे आणण्यात आला. या दरम्यान रफिकची पत्नी केरळमध्ये असल्याने कुटुंबियांनी तिलाही बोलावून घेतले. तिने ओळख पटविल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर पोलिसांनी मृतदेह या कुटुंबाकडे सोपविला. त्यानंतर या कुटुंबाने मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार केले.

बेपत्ता व्यक्ती सापडला : सोशल मीडियावर व्हायरल झालेली छायाचित्रे आणि माहितीवरून बेपत्ता झालेला रफिक हा सकवार येथील एका आश्रमात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे संबंधित कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला. कुटुंबीयांनी तिथे जाऊन पाहिले असता आश्रमातील व्यक्ती रफिकच असल्याचे त्यांच्या लक्षात झाले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. रफिक आणि अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती यांच्या चेहऱ्यात साम्य असल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.

'ती' मृत व्यक्ती कोण ? : कुटुंबाने रफिक समजून अंत्यसंस्कार केलेली ती अनोळखी व्यक्ती कोण, असा प्रश्न या प्रकारामुळे आता पोलिसांसह सर्वांनाच पडला आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक नरेश रणधीर आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव मुडावदकर यांनी दिली आहे.

असा झाला होता रफिक बेपत्ता : रफिक कर्करोगाने ग्रस्त असल्याने केरळमधून पालघर येथे नातेवाइकांकडे आला होता. त्यानंतर तो इकडे-तिकडे भटकत होता. या दरम्यान त्याला कोणीतरी आश्रमात नेऊन ठेवले होते. त्यानंतर कुटुंबियांचा त्याचाशी संपर्क होऊ शकला नाही. तो बेपत्ता झाल्याचे समजून कुटुंबियांनी त्याचा शोधही घेतला होता.

हेही वाचा : Nashik Suicide Case: सावकाराच्या जाचामुळे दोघा सख्ख्या भावांनी पिले विष, एकाचा मृत्यू

Last Updated : Feb 6, 2023, 9:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.