ETV Bharat / state

पालघर: आदिवासी कुटुंबाला नगरपंचायतीकडून वारंवार नोटीसा - Nagar Panchayat palghar

वाढीव बांधकाम केले आणि सार्वजनीक रस्ता खुला करुन देण्यासाठी वाडा नगरपंचायतील हद्दीत एका आदिवासी समाजाच्या कुटुंबाला नगरपंचायतीकडून वारंवार नोटीसा पाठविण्यात आल्या. ही कारवाई फक्त आमच्यावर का? शहरातील इतर बांधकामावर नोटीसा देवून कारवाई का केली जात नाही. असा सवाल आदिवासी कुटुंबीयाने करुन या नगरपंचयतीच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे.

पालघर नगरपंचायत
पालघर नगरपंचायत
author img

By

Published : Mar 10, 2021, 12:58 AM IST

पालघर - पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीच्या हद्दीत एकता नगर मधील अनिल काशिनाथ वाणी, राजेंद्र काशिनाथ वाणी आणि इतर असे आदिवासी समाजाचे कुटुंब राहते. या कुटुंबाने नगरपंचायती दप्तरी नोंद असलेल्या बांधकामपेक्षा वाढीव बांधकाम केले आहे. तसेच सार्वजनीक रस्ता अतिक्रमण केल्याच्या नोटीसा या कुटुंबांना नगरपंचायतीने पाठविल्या आहेत. वाढीव बांधकाम तातडीने हटविण्यासाठी नगरपंचायतीने जव्हार इथल्या नगरपरिषदकडून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्याचप्रमाणे जेसेबी व इतर यंत्रणा उभी करण्यात आली.

पालघर: आदिवासी कुटुंबाला नगरपंचायतीकडून वारंवार नोटीसा
कारवाईला आदिवासी एकता परिषदेचा आक्षेप-

नगरपंचायतीच्या या कारवाईवर इथल्या आदिवासी एकता परिषदेने आक्षेप नोंदवून नगरपंचायतीच्या कार्यालयात अधिकारीवर्ग आणि वाढीव बांधकाम केलेले कुटुंबियांनी याबाबत चर्चा केली. त्यामूळे ही कारवाई तुर्तास थांबली आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई का नाही-

शहरात नगरपंचायतीकडून अनधिकृत बांधकामावर नोटीसा देण्यात आल्या. मात्र त्यांच्यावर कारवाई नाही. आदिवासी समाजातील कुटुंबावर वाढीव बांधकाम केले आहे म्हणून तातडीने अग्निशमन दल व आवश्यक यंत्रणा उभी केली जाते. हा अन्याय का केला जातो. आमचे कुटुंब गेली 70 ते 80 वर्ष येथे राहते. घरपट्टी व इतर कर भरतो.त्याचप्रमाणे मी रस्ता देण्यास तयार आहे. ज्यामालकाने हा रस्ता देण्याचे कबूल केले आहे. त्याच्या जागेची मोजणी करुन रस्ता खुला करुन द्यावा, अशी विनंती नगरपंचायतीला करीत असल्याचे राजेंद्र काशिनाथ वाणी यांनी सांगितले.

हेही वाचा- माझ्या वडिलांनी ऊस तोडलाय, ऊसतोड मजुरांच्या व्यथा मी जाणतो, धनंजय मुंडेचे भावनिक उद्गार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.