पालघर - वसईच्या कॉर्नेलियस पास्कोल अल्फान्सो यांच्या घरात २९ डिसेंबर २०१९ ला एका कोंबडीने दिलेल्या अंड्यातून चार पायांच्या पिल्लाचा जन्म झाला आहे. चार पायाचे हे कोंबडीचे पिल्लू पाहून तिचा मालकही आवाक झाला. हे पिल्लू पाहून अशा प्रकार चार पायांचे पिल्लू जिवंत राहू शकते का? असा प्रश्न आता त्यांना पडला आहे.
हे कोंबडीचे पिल्लू सर्वसामान्य कोंबडीच्या पिल्लांपेक्षा अतिशय वेगळे आहे. सर्वसामान्य कोंबडीला दोन पाय, दोन पंख, दोन डोळे, तोंड तुरा असतो. मात्र, या पिल्लाला पुढे दोन आणि मागच्या बाजूला दोन पाय आहेत. अशाप्रकारची घटना क्वचितच घडते. या विचित्र कोंबडीच्या पिल्लाची अल्फान्सो हे जास्त काळजी घेत आहेत. या पिल्लाला इतर कोंबड्याच्या पिल्लांप्रमाणे चालता येत नाही. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण वसई परिसरात रंगली असून बघ्यांची गर्दीही जमत आहे.