पालघर/वसई - महिला आणि पुरुष डॉक्टराला रुग्ण आणि त्याच्या मित्रांनी धक्काबुकी करुन अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा पूर्व नगीनदासपाडा येथील तुलिंज हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे, तर तिघे जण फरार झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मद्यधुंद रुग्णासह चौघांचे तुळींज रुग्णालयातील डॉक्टरांशी असभ्य वर्तन, केबिनची तोडफोड - तुळींज रुग्णालय डॉक्टरांना अश्लील भाषेत शिवीगाळ
तुळींज हॉस्पिटलमधील केबिनच्या काचाही या टोळक्याने फोडल्याचा प्रकार घडला आहे. डॉक्टरांसोबत झालेला हा धक्कादायक प्रकार हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात चौघा जणांविरोधात संगनमताने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे, तर अन्य तीन जण पसार झाले आहेत.
तुळींज रुग्णालयातील डॉक्टरांशी असभ्य वर्तन
पालघर/वसई - महिला आणि पुरुष डॉक्टराला रुग्ण आणि त्याच्या मित्रांनी धक्काबुकी करुन अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा पूर्व नगीनदासपाडा येथील तुलिंज हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे, तर तिघे जण फरार झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
Last Updated : Jun 16, 2021, 10:31 AM IST