ETV Bharat / state

विरारमध्ये अनधिकृत इमारतीचा भाग कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू - भूमी विनोद पाटील

10 वर्षे जुन्या नित्यानंद धाम या चार मजली इमारतीचा टेरेस आणि चौथ्या मजल्यावरील सज्जा रात्री आठच्या सुमारास कोसळला. या घटनेत भूमी विनोद पाटील या पाच वर्षीय चिमुकलीचा ढिगार्‍याखाली अडकल्याने मृत्यू झाला आहे.

विरारमध्ये अनअधिकृत इमारतीचा भाग कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू
author img

By

Published : Oct 16, 2019, 2:18 AM IST

Updated : Oct 16, 2019, 8:55 AM IST

पालघर - विरार पूर्व येथील कोपरी परिसरातील 'नित्यानंद धाम' या चार मजली इमारतीचा काही भाग मंगळवारी रात्री आठच्या सुमारास कोसळला. या घटनेत भूमी विनोद पाटील या पाच वर्षीय चिमुकलीचा ढिगार्‍याखाली अडकल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

विरारमध्ये अनअधिकृत इमारतीचा भाग कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

हेही वाचा - वसईतील पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय

विरार पूर्व मधील कोपरी गावातील नित्यानंद नगर परिसरात अनेक अनधिकृत इमारती आहेत. या इमारतींपैकीच 10 वर्षे जुन्या नित्यानंद धाम या चार मजली इमारतीचे टेरेस आणि चौथ्या मजल्यावरील सज्जा रात्री आठच्या सुमारास कोसळला. कोसळलेला भाग इमारतीखालील दुचाकींवर पडला. परिणामी वाहनांचेही नुकसान झाले आहे. दुर्घटना घडली त्या वेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर 10 कुटुंब वास्तव्यास होती. चौथ्या मजल्यावरील भाग कोसळल्याने रहिवाशांना बाहेर पडण्यास अडथळा येत होता. अग्निशमन दल येण्याआधीच स्थानिक नागरिकांनी बचावकार्याला सुरुवात केली होती. दरम्यान, शेजारील इमारतसुद्धा कोसळण्याच्या स्थितीत असल्याने या इमारतीतील रहिवाशांनादेखील तातडीने मोकळ्या मैदानात धाव घेतली होती.

Intro:विरारमध्ये इमारतीचा भाग कोसळला
पाच वर्षीय मुलीचा मृत्यूBody:विरारमध्ये इमारतीचा भाग कोसळला
पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

पालघर/विरार - विरार पूर्व येथील कोपरी परिसरातील नित्यानंद धाम या चार मजली इमारतीचा काही भाग मंगळवारी रात्री आठच्या सुमारास कोसळला. या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे.
विरार पूर्व कोपरी गावातील नित्यानंद नगर परिसरात अनेक अनधिकृत इमारती आहेत. या इमारतींपैकी 10 वर्षे जुन्या नित्यानंद धाम या चार मजली इमारतीचा टेरेस आणि व चौथ्या मजल्यावरील सज्जा रात्री आठच्या सुमारास कोसळला. या वेळी मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोसळलेला भाग इमारतीखालील दुचाकींवर कोसळला. परिणामी वाहनांचे नुकसान झाले. या लक्ष भूमी विनोद पाटील ही पाच वर्षांची मुलगी ढिगार्‍याखाली अडकल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
दुर्घटना घडली त्या वेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर 10 कुटुंब होती. चौथ्या मजल्यावरील भाग कोसळल्याने रहिवाशांना बाहेर पडण्यास अडथळा येत होता, मात्र अग्निशमन दल येण्याआधीच स्थानिक नागरिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. दरम्यान, शेजारील इमारतसुद्धा कोसळण्याच्या स्थितीत असल्याने या इमारतीतील रहिवाशांनादेखील तातडीने मोकळ्या मैदानात धाव घेतली.Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 8:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.