ETV Bharat / state

ऐन मोसमात चक्रीवादळाचा तडाखा; मच्छिमारांवर उपासमारीची वेळ

आधी अवकाळी पावसाचा तडाखा, आणि त्यानंतर आलेली क्यार आणि महा चक्रीवादळे, यामुळे सुमारे चार महिने पालघरच्या समुद्रातील मासेमारी बंद राहिली. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा मच्छिमारांसाठी मोक्याचा काळ असतो. मात्र, यावेळी नेमक्या याच काळात मासेमारी बंद राहिल्यामुळे, मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Fisherman in maharashtra in trouble due to cyclons
author img

By

Published : Nov 17, 2019, 11:46 PM IST

पालघर - अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांसोबतच मच्छिमारांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कित्येक दिवस मच्छिमारांच्या बोटी समुद्रातच गेल्या नसल्याने, मच्छिबाजारात मासळीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध होणारी मासळी साहजिकपणे महाग झाली आहे. या सर्वाचा फटका मच्छिमारांना तर बसला आहेच, मात्र चवीने मासे खाणाऱ्या खवय्यांनाही बसला आहे.

आधी अवकाळी पावसाचा तडाखा, आणि त्यानंतर आलेली क्यार आणि महा चक्रीवादळे, यामुळे सुमारे चार महिने पालघरच्या समुद्रातील मासेमारी बंद राहिली. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा मच्छिमारांसाठी मोक्याचा काळ असतो. मात्र, यावेळी नेमक्या याच काळात मासेमारी बंद राहिल्यामुळे, मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या वादळांच्या तडाख्यांमुळे सुमारे वीस हजार नौका बंदरावरच आहेत. मासेमारीच्या सर्वात अनुकूल काळात जर व्यवसाय झाला, तर साधारणपणे वर्षभराची कमाई होऊन जाते. मात्र या कालावधीतच मासेमारी न झाल्यामुळे मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई म्हणून शासनाने मच्छिमारांसाठी २,१०० कोटी रूपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी, ठाणे-पालघर मच्छिमार सहकारी संघ मर्यादित महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष नारायण शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये मासळी महागल्याने खवय्यांचे हाल

Intro:
चक्रीवादळाने मत्स्यव्यवसायाला फटका
मच्छी महागाई खवय्यांचे तोंडचे पाणी पळाले 
मत्स्यव्यवसायाला नुकसान भरपाई द्यावी - मच्छीमारांची मागणी

पालघर(वाडा) संतोष पाटील

चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकरीवर्गाबरोबरच मच्छिमारवर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मच्छिमारी बंदीचा फटका हा बाजारात मच्छीचा तुटवडा जाणवू लागला आहे.बंदरापासुन ते ग्रामीण भागातील बाजारपेठेत मच्छी दाखल होत असताना ती महाग किंमतीने ग्राहकाला विकत घ्यावी लागते.त्यामुळे चवीने मच्छी खाणा-यांचेही तोंडचे पाणी पळाले आहे. तर मच्छीमार नुकसानभरपाईची मागणी करीत आहेत. 
पालघर सह राज्यात अवकाळी पावसाने शेतकरीवर्गाच्या भाविकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याच प्रमाणे क्यार वादळानंतर महाचक्रीवादळाचे संकट ओढावले.यात शेतकऱ्यांसह मच्छीमारी करणाऱ्या संकटाचा सामना करावा लागला.शेतकरी जसे भातपिकाची शेती करतात तसे किनारपट्टीतील मच्छीमार हे मत्सशेती करतात.    किनारपट्टी भागात समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या 4 महीने बंद राहीली. ऑगस्ट पासुन ते ऑक्टोबपर्यंत मच्छीमारी करण्याचा सीझन असतो.या कालावधीत केलेली मच्छीमारी ही वर्षभर उत्पन्नाचे साधन मच्छीमारांचे बनत असते.माञ यावेळी समुद्रात उठलेली चक्रीवादळाने राज्यातील कोकण किनारपट्टीवरची मच्छीमारी धोक्यात आली.महा चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने  हाय अलर्ट जारी केला होता.त्यामुळे इथल्या बंदरपट्टीतील मासेमारी करणाऱ्या  दोनहजारहून अधिक बोटी माघारी बोलविण्यात आल्या होत्या.याचा फटका मत्स्यव्यवसायाला बसला आहे.

मच्छीमारी अडचणीत आल्याने ग्रामीण भागात वाटते शहरी भागात बाजारात दाखल झालेला महागलेला  आहे. 100 ते 200 ,500 रूपये असलेले विवीध मच्छीचे वाट्यांचा दर वाढलेला आहे.
यावर विक्रेतेही  वादळ आणि बोटीतून माल येत नाही .मच्छीचा तुटवडा आहे.आणि वाहतूक खर्च वाढत आहे त्यामुळे मच्छी महागडी झाली आहे. 
Byte
प्रतिक्रिया -
 बाजारात दाखल झालेली मच्छी महाग आहे सर्व सामान्य ग्राहक खरेदी करू शकत नाही.ग्रामीण भागात मच्छीचा तुटवडा आहे.वादळामुळे मच्छीमारी करणा-यांचे नुकसान झाले आहे.शासनाने नुकसानभरपाई द्यावी.
संतोष राऊत 
सर्वसामान्य ग्राहक
Byte
प्रतिक्रिया -
वादळामुळे मत्स्यव्यवसायाला खीळ बसली आहे. राज्यात 20 हजारहून अधिक नौका मासेमारी न  करता पडून आहेत. 1 ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत मासेमारीचा काळावधी अनकुल असतो.माञ या तीन महीने मासेमारी नाहीत झाल्याने मत्स्यव्यवसायीकांवर व त्यावर अवलंबून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.तीन महीने मासेमारी  करून वर्ष भराचे उत्पन्नाचे साधन  मच्छीमारीतून मिळत असते.जाळे,इतर कामासाठी खर्च मोठा येतो.या भागात सहा,चार,तीन,दोनआणि एक सिलेंडर वाल्या नौका मासेमारी साठी असतात.

नुकसान भरपाई म्हणून शासनाने एक सिलेंडर नौकेस  एकलाख रूपये, दोन सिलेंडर नौकेस दोन लाख,तीन सिलेंडरला तीन लाख रूपये ,चार सिलेंडर नौकेस चार लाख आणि सहा सिलेंडरच्या नौकेस सहा लाख रूपये अशी भरपाई द्यावी.   कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या अशा विवीध अडचणी या मच्छीमारी बंदीने निर्माण झाल्या आहेत. मत्सव्यवसाय अडचणीत आल्याने शासनाने मच्छीमारी करणा-यांनाही 2100 कोटी रूपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी पालघर येथील ठाणे -पालघर मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ मर्यादित महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष  नारायण काशिनाथ विदे यांच्याकडून होत आहे.

Body:two byte

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.