पालघर - जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी ( chemical company in Boisar MIDC ) परिसरात बॉयलरचा स्फोट ( Boiler explosion ) झाल्याने केमिकल कंपनीत आग ( Fire broke out in chemical company ) लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोपाल गुलजारीलाल सिशोदिया (३५), पंकज यादव (३२), सिकंदर (२७) अशी मृत कामगारांची नावे आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेत. आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक लोक आगीत अडकल्याची भीती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ऑटोक्लेव्ह रियाक्टरमध्ये प्रेशर वाढल्याने स्फोट- औद्योगिक क्षेत्रातील में भगेरिया इंड्रस्ट्रिज लि. मध्ये सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास गामा ॲसिड या केमिलच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू असताना ऑटोक्लेव्ह रियाक्टरमध्ये प्रेशर वाढल्याने झालेल्या दोन भिषण स्फोट झाले. स्फोटाच्या आवाजाने 4 - 5 किलो मीटर पर्यंतचा परिसर हादरला. या भिषण स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू तर 12 कामगार जखमी झाले आहेत. या पैकी एका कामगाराची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व जखमी कामगारांवर बोईसरच्या शिंदे हॉसिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
वायुगळतीमुळे घडली घटना - घटनेच्या वेळी घटना स्थळी 18 कामगार असल्याची माहिती समोर आली असून, दिवाळी सणाच्या सुट्टीमुळे कारखान्यातील एकूण संख्या व इतर कामगारांबाबत शोध सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाल्याने अनेक कामगार जीव मुठीत धरून पळाल्याचे बोलले जात आहे. कारखान्यातील भिषण स्फोटच्या ठिकाणी मलब्याचा मोठा ढिगारा झाल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस अन्य कंपन्यातील सुरक्षा अधिकार्यांनी घटना स्थळी दाखल झाले. परंतु सदरची घटना घडल्या नंतर बराच वेळ या घटेनेची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली नसल्याने समोर आले आहे.
दोषींवर कारवाई - बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणचे प्रभारी अधिकारी श्री. प्रदिप कसबे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचलनालय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. औद्योगिक सुरक्षा आरोग्य विभागाचा कोणी अधिकारी रात्री उशिरा पर्यंत घटना स्थळी आलेले नव्हते. दरम्यान घटना स्थळी, उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षित कामगार सुरक्षा अधिकारी नसल्याची बाब समोर आली आहे.
जखमीची नावे -1) मुकेश चेनू दास. वय 33 वर्ष, 2) श्रवण मुरारी दास, वय 33 वर्ष 3) हिमांशू प्रमोद पाठक, वय 30वर्ष 4) घनश्याम रामप्यारे निषाद, वय 45 वर्ष 5) देवेंद्र कुबेर यादव, वय 22 वर्ष 6) अरुण ओमप्रकाश पटेल, वय 27 वर्ष, 7) राजू कुंजीलाल पासवान, वय 40 वर्ष 8) हंसराज लालधारी यादव, वय 40 वर्ष 9) नारायण श्रीकिशोर मिश्रा, वय 24 वर्ष 10) सुनील हिरा, वय 31 वर्ष 11) भवानी रामसजीवन शिंग, वय 19 वर्ष 12) श्रीराम मनिलाल मेहता, वय 18 वर्ष तर
मृतांची नावे - 1) गोपाल गुलजारीलाल शोसोडिया, वय 27 वर्ष, रा. महावीर चेम्बर, बोईसर 2) पंकज यादव, वय 32 वर्ष, रा. शिवाजीनगर, सालवड. 3) सिंकदर कुमार गोस्वामी.
उत्पादन सुरू असताना हा स्फोट - मिळालेल्या माहितीनुसार, या केमिकल कंपनीत उत्पादन सुरू असताना हा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. या स्फोटानंतर गॅस गळती देखील सुरु आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी मदत आणि बचावकार्य करत आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे आद्याप स्पष्ट झाले नाही. प्राप्त माहितीनुसार, सदर कंपनी सॅनिटायझिंग आणि हात धुण्याचे लिक्विड बनवण्याची कंपनी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात या कंपनीचे काम सुरूचं होते. या कंपनीच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. ही कंपनी केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सुरू ठेवण्यात आली होती.