ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर लिमिटेड कंपनीला आग; एक कामगार जखमी

author img

By

Published : Feb 13, 2021, 3:02 PM IST

Updated : Feb 13, 2021, 3:12 PM IST

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर एन 128 येथील बजाज हेल्थकेअर लिमिटेड कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे.

fire
बजाज हेल्थ केअर लिमिटेड कंपनीला आग

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीत लागलेल्या आगीत एक कामगार जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी बोईसर येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर लिमिटेड कंपनीला आग

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर एन 128 येथील बजाज हेल्थकेअर लिमिटेड कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

एक कामगार जखमी -

कंपनीत लागलेल्या आगीत एक कामगार जखमी झाला असून निलेश विलास बोरसे असे या कामगाराचे नाव आहे. जखमी कामगाराला उपचारासाठी बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीचे कारण अस्पष्ट -

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या प्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Feb 13, 2021, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.