पालघर (वाडा) - मान्सूनच्या प्रतिक्षेने क्षीण झालेला बळीराजा अखेर आज खरीप हंगामातील भात पिकाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. लांबणीवर जाणारा शेती हंगाम वेळेत साधता यावा, यासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पेरणीच्या हंगामाला सुरुवात केली आहे. पण पावसाच्या बेभरवशाचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकरीवर्ग भातशेती हंगामासाठी मान्सून पुर्वकाळात बी -बियाणांची, खते, शेती अवजारे आणि मजूर मार्गाच्या शोधात असतो. या सर्व बाबींची जुळवाजुळव करून बियाणे पेरणीची कामे हाती घेत असतो. पारंपरिक पद्धतीने वा आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेतजमीन नांंगरत असतो. यावेळी पावसाचा अंदाज काही हवामान खात्याला सापडत नाही. आज येईल दोन दिवसांत येईल या आशेने तर पाऊस पडला तर ठीक नाहीतर पेरलेलं पीक पावसाअभावी करपून जाऊ शकते? जास्त पावसात पेरणी करता येणार नाही.आणि भातशेती हंगाम ही वेळेत साधता येणार नाही. त्यामुळे बळीराजा सध्या द्विधा मनस्थितीत अडकला आहे. मान्सुनबाबत हवामान खातेही बेभरवशाचा झाला आहे. त्यांच्याकडूनही पावसाबाबत तारीख पे तारीख असा प्रकार सुरू आहे.
सलग तीन दिवस २५ मिमी पाऊस पडला असेल आणि जमीनीतून वाफसा येत असेल शेतकरी वर्गाने पेरणी करायला हरकत नाही. असे वाडा तालुक्यातील कृषी अधिकारी ए. हासे यांनी सांगितले आहे.
यावर पाऊसच पडत नाही तर पेरणी कशी करू? आणि पेरले तर ते पावसाअभावी मरुन जाईल, अशा परिस्थितीत पावसाची वाट पहाण्याशिवाय शेतकरीवर्गाकडे पर्याय नसल्याचे सुनील हरड या शेतकऱ्याने सांगितले.