विरार (पालघर) - विरार पूर्वेतील चंदनसार येथील मुख्य रस्त्यावर लोंबकळत असलेल्या विद्युत वाहक तारेला पालिकेच्या कचरा वाहतूक गाडीचा धक्का लागूल्याने तार तुटून खाली पडली. सोमवारी (दि. 21 डिसें.) सकाळी साडे दहाच्या वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही.
प्रसंगावधान राखत चालकाने घेतली वाहनातून उडी
विरार पूर्वेतील चंदनसार येथील कोविड सेंटरच्या समोरच पालिकेची कचऱ्याची गाडी वळसा घेत होती. त्यावेळी खांबावर असलेल्या विद्युत वाहक तार ही कचऱ्याच्या गाडीला अडकल्याने तुटली. तुटलेली विद्युतवाहक तार रस्त्यावर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे कचऱ्याच्या गाडीवर ही तार अडकून असल्याने वाहनचालकांने प्रसंगावधान राखत गाडीतून तातडीने बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
बांबूच्या सहयाने तार केली बाजूला
विद्युत वाहक तार बराच वेळ रस्त्यावर असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. ही तार बाजूला करण्यासाठी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी व पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी ती तार लाकडी बांबूच्या सहायाने ती तार बाजूला हटविण्यात आली.
हेही वाचा - सोनसाखळी चोरणारे दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
हेही वाचा - श्रमजीवी संघटनेच्या मागणीला यश; खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द