पालघर - डहाणू, तलासरी या परिसरात आज पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
तलासरी, डहाणू परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून भूकंपाची मालिका सुरू आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे डहाणू येथील शिसने भागात घरांना तडे गेले आहेत. तसेच घरातील पीओपी देखील खाली पडले आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.