ETV Bharat / state

ई-पीक नोंदणीसाठी कोकण विभागातून वाडा तालुक्याची निवड; संपूर्ण सेवा योजनेंतर्गत दाखल्यांचे वितरण

मोबाईल अॅपमुळे शेतकरीवर्गाला आपल्या पीक पाहणीची नोंद, नैसर्गिक आपत्तीने होणारे पिकाच्या नुकसानी नोंद होणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला घरबसल्या नोंदीची सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांची तलाठी कार्यालयात होणारी धावपळ थांबणार आहे.

ई-पीक नोंदणीसाठी कोकण विभागातून वाडा तालुक्याची निवड
author img

By

Published : Jun 18, 2019, 9:14 PM IST

Updated : Jun 18, 2019, 11:05 PM IST

पालघर (वाडा) - वाडा तालुक्यातील कुडुस येथे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने शालेय विद्यार्थी वर्गाला संपूर्ण सेवा अभियानांतर्गत विविध प्रकारचे दाखले वितरण आणि ई-पीक पाहणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कोकण तालुक्यातून वाडा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शनासाठी व दाखले वाटपासाठी वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे आणि तलाठी, मंडळ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

ई-पीक नोंदणीसाठी कोकण विभागातून वाडा तालुक्याची निवड

सेल्फ रिपोर्टींग ऑफ क्रॉप्स बाय फारमर्स या महसूल विभागाच्या अॅप डेव्हलपमेंटकरिता कोकण विभागीय स्तरावर वाडा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या मोबाईल अॅपमुळे शेतकरीवर्गाला आपल्या पीक पाहणीची नोंद, नैसर्गिक आपत्तीने होणारे पिकाच्या नुकसानी नोंद होणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला घरबसल्या नोंदीची सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांची तलाठी कार्यालयात होणारी धावपळ थांबणार आहे. शेतकरी वर्गाने आपल्या लागवडी पिकाची नोंदणी १५ ऑगस्टपर्यंत करावयाची आहे. त्याची पाहणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करायची असल्याची माहिती वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी १७ जूनला कुडूस येथे बोलताना दिली.

या कार्यक्रमातच कुडूस येथे दहावी-बारावीच्या विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते. दाखले मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे सामान्य जनतेबरोबरच विद्यार्थी वर्गाचा ओघ असतो. यात त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. विद्यार्थींना दाखल्यांबाबत गैरसोय होऊ नये महसूब विभागाच्यावतीने दाखले वितरण कॅम्प हाती घेतले आहे. यामध्ये उत्पन्न दाखले - ४१३,नॉन क्रिमिलेअर दाखले- ४२, डोंगरी दाखले -६५, अधिवास दाखले - ५२, जातीचा दाखला - ३६, रहिवाशी दाखले -१२ असे एकूण 620 दाखले विद्यार्थी व पालकवर्गाला देण्यात आले. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी लागवडी केलेल्या पिकांची पहाणी ई-प्रणालीद्वारे कशी करायची याबाबतचे मार्गदर्शन तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी केले.

Intro:
ई पिक नोंदणीसाठी कोकण विभागात पहीली वाडा तालुक्याची निवड,
ई पिक नोंदणी व पहाणी कार्यशाळेत शेतकरीवर्गाला मार्गदर्शन ,
संपूर्ण सेवा योजनेत विवीध दाखले वितरण

पालघर (वाडा)-संतोष पाटील
वाडा तालुक्यातील कुडूस येथे शाळेय विद्यार्थीवर्गाला विवीध प्रकारचे दाखले देण्यासाठी संपूर्ण सेवा अभियानाअंतर्गत दाखले वाटप व ई पिक पहाणी कार्यशाळा पालघर जिल्हाधिकारी द्वारा आयोजित करण्यात आली होती. याबाबत कार्यशाळेच्या मार्गदर्शन करण्यासाठी व दाखले वाटपासाठी वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे आणि तलाठी,मंडळ अधिकारी असे कर्मचारी उपस्थित होते.
सेल्फ रिपोर्टींग आँफ क्रॉप्स बाय फारमरर्स या महसुल विभागाच्या अँप डेव्हलपमेंट करिता कोकण विभागीयस्तरावर पहीले वाडा तालुक्याची निवड करण्यात आली आहे.या मोबाईल अँपमुळे शेतकरीवर्गाला आपल्या पिक पहाणीची नोंद,नैसर्गिक आपत्तीने होणारं पिकाचे नुकसानी नोंद होणार आहे.त्यामुळे शेतकरीवर्गाला घरबसल्या नोंदीची सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकरीवर्गाची तलाठी कार्यालयातील धावपळ थांबणार आहे ई पिक नोंदणी शेतकरी वर्गाने आपल्या लागवडी पिकाची नोंदणी सातबारा करावयाची आहे ही नोंदणी 15 ऑगस्ट पर्यंत करावयाची आणि त्याची पहाणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करायची असल्याची माहीत वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी 17 जुन कुडूस येथे बोलताना दिली. या कार्यक्रमातच तालुक्यातील कुडूस येथे दहावी - बारावी विद्यार्थी वर्गाला विवीध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते.दाखले मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे सामान्य जनतेबरोबरच विद्यार्थी वर्गाचा ओघ असतो.यात त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात.अशातच विद्यार्थीवर्गाला दाखल्यांबाबत गैरसोय होऊ नये म्हणून महसुली विभाग दाखले वितरण कॅम्प हाती घेतली असतो.यात उत्पन्न दाखले - 413,नॉन क्रिमी लेअर दाखले - 42,डोंगरी दाखले - 65,अधिवास दाखले - 52,जातीचा दाखला - 36,रहिवास दाखले -12

एकूण दाखले वाटप - 620 दाखले विद्यार्थी व पालकवर्गाला करण्यात आले.
त्याच बरोबर शेतकऱ्यांनी लागवडी केलेल्या पिकांची पहाणी ई प्रणालीद्वारे कशी करायची याबाबत मार्गदर्शन महसुली कर्मचारी व उपस्थित शेतकरीवर्गाला वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी केले. Body:With video,photos Conclusion:V
Last Updated : Jun 18, 2019, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.