ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे मोखाडा-त्र्यंबकेश्वरदरम्यान मोरचुंडीजवळील रस्ता खचला - mokhada

मोखाडा तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोखाडा-त्र्यंबकेश्वरदरम्यान मोरचुंडी गावाजवळ रस्ता खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

पावसामुळे मोखाडा त्रंबकेश्वर रोडवरील मोरचुंडी येथील रस्ता खचला
author img

By

Published : Jul 11, 2019, 10:51 AM IST

Updated : Jul 11, 2019, 11:21 AM IST

पालघर- मोखाडा तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोखाडा-त्र्यंबकेश्वरदरम्यान मोरचुंडी गावाजवळ रस्ता खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन होणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

बुधवारी रात्री मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मोखाडा-त्र्यंबकेश्वरदरम्यान मोरचुंडी गावाजवळ रस्ता खचला असून डहाणू, चारोटी पालघर, जव्हार, विक्रमगडवरून नाशिककडे जाणारी व नाशिकहून येणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पावसामुळे मोखाडा-त्र्यंबकेश्वरदरम्यान मोरचुंडीजवळील रस्ता खचला

दोन दिवसांपासून मोखाडा तालुक्यात पाऊस सुरू आहे. याचा परिणाम म्हणून मोरचुंडी येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे या पुलाला मोठे भगदाड पडले आणि रस्ता खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात भूमिगत तारा टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून हा रस्ता खचल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

rain
पावसामुळे मोखाडा त्र्यंबकेश्वर रोडवरील मोरचुंडी येथील रस्ता खचला

मुसळधार पावसामुळे मोरचुंडी गावातील बहुतांश घरात पाणी शिरले होते. रस्ता खचून वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यामुळे परिसरातील 25 हून अधिक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Intro: काल आणि रात्री मोखाडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोखाडा त्रंबकेश्वर रोडवरील मोरचुंडी येथील रस्ता खचलाBody:नमित पाटील
पालघर, दि.11/7/2019
काल आणि रात्री मोखाडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोखाडा त्रंबकेश्वर रोडवरील मोरचुंडी येथील रस्ता खचला. डहाणू,चारोटी पालघर,जव्हार,विक्रमगड वरून नाशिककडे जाणारी व नाशिकहून येणारी आणि वाहतूक पूर्णपणे बंदConclusion:null
Last Updated : Jul 11, 2019, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.