ETV Bharat / state

किमान अडीचशे विद्यार्थांमागे एका कला आणि क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी - पालघर विद्यार्थी

विद्यार्थांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी किमान अडीचशे विद्यार्थांमागे एका कला आणि क्रीडा शिक्षकांची स्वतंत्रपणे नियुक्ती करावी, अशी मागणी पालघर जिल्हा कलाध्यापक संघांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कलाध्यापक संघाच्या वतीने पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

palghar news
पालघर जिल्हा कलाध्यापक संघांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
author img

By

Published : Oct 28, 2020, 6:27 PM IST

पालघर - विद्यार्थांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी किमान अडीचशे विद्यार्थांमागे एक कला आणि क्रीडा शिक्षकांची स्वतंत्रपणे नियुक्ती करावी, अशी मागणी पालघर जिल्हा कलाध्यापक संघांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कलाध्यापक संघाच्या वतीने पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शालेय संच मान्यतामध्ये १९८१ च्या कर्मचारी सेवाशर्ती नियमावलीनुसार किमान अडीचशे विद्यार्थांमागे एक कला आणि क्रीडा शिक्षक असावा असे म्हंटले आहे. त्यानुसार शिक्षकांच्या नेमणुका करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निवेदन पाठवण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक संवर्गातील पदासाठी संच मान्यतेच्या निकषानुसार कलाशिक्षक पदावर अन्याय होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयामार्फत संच मान्यतेच्या निकषात बदल करण्या संदर्भातले नवीन बदल शासनास पाठविण्यात आले आहेत. सन २०१४-१५ मध्ये अनेक शिक्षक संचमान्यतेत नव्हते. इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते दहावी आणि इयत्ता अकरावी व बारावी असे वेगवेगळे गट असल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त होत होते. माध्यमिक शाळांना मंजूर करावयाच्या शिक्षक पद निश्चितीसाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे वेग वेगळे गट न दाखवता इयत्ता पाचवी ते दहावीचा एकच गट करून सरसकट ३५ विद्यार्थ्यांमध्ये एक पद कला शिक्षकाचे निश्‍चित करावे. याच धर्तीवर शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव शिक्षकांचे विशेष शिक्षक पद निश्चित करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या पालघर जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश वझे, उपाध्यक्ष महेंद्र पाटील, प्रीतम घरत, कार्यवाह नितीन जैतकर, कोषाध्यक्ष भास्कर खेडकर, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे कोअर कमिटी सदस्य प्रमोद पाटील, पालघर कलाध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल घरत उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.