पालघर : पालघर जिल्ह्यातील केळवे गावातील वडाळा तलावात हजारोच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले आहेत. ( Expenditure of dead fish in Wadala Lake ) जाणीवपूर्वक मासे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याचा संशय त्यामुळे व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे तलावात असणाऱ्या हजारोंच्या संख्येतील लहान-मोठ्या आकाराच्या मत्स्यसंपदेलाही ( Loss of fisheries ) त्यामुळे हानी पोहोचली असून, तलावातील पाणीदेखील दूषित झाले असावे, अशी शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. केळवे गावात अनेक तलाव असून, तलावातील स्वच्छता व पाण्याची पातळी राखून ठेवण्यासाठी टेंडर पद्धतीने हे तलाव मत्स्य पालनासाठी दिले जात असतात. ( These lakes are tendered for fish farming )
दरवर्षी तलावाच लिलाव : दरम्यान, केळवा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये भरणे पाडा येथे वडाळा नावाचे तलाव आहे. दरवर्षी या तलावाचा लिलाव केला जातो. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये २०२० मध्ये ग्रामपंचायतीने लिलाव केला असता, भरणे पाडा येथील सागर किणी यांनी १ लाख ७५ हजार रुपयांना लिलाव घेतला. या तलावामध्ये सागर किणी याने सुमारे तीन लाखांचे रोहू, कतला आणि सिल्व्हर माशांचे मत्स्यबीज टाकले होते. सदर लिलाव १५ जून २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. या तलावातून मासे काढून विक्री केली जाते. मात्र, शनिवारी सकाळी दीड ते दोन किलो वजनाचे सुमारे सहाशे ते सातशे किलो मोठ-मोठे मासे तलावाच्या पाण्यावर मृत अवस्थेत तरंगताना आढळले. आतापर्यंत मासे गर्मीमुळे किंवा इतर कोणत्या कारणांमुळे मृत झाले आहे, याचा अंदाज अजून आला नाही. जवळ जवळ तीन ते साडेतीन लाखांचे मासे मृत झाले असल्याचा अंदाज असून, लिलाव मालक सागर किणी यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
दरम्यान, तलावातील मृत मासे व पाणी यांचे तत्काळ परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी केळवे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा : Reduced Fish Production : पालघर जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात घट