पालघर - दोन महिन्यांपासून बंद असलेल्या कारखान्यातील सांडपाणी प्रक्रियेविना नदी, नाले, खाडीत सोडण्याचे परिणाम लगेचच दिसू लागले आहेत. पालघर येथील बिडको औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित सांडपाणी पाणेरी नदीत सोडण्यात आल्याने पाण्याला काहीसा रासायनिक रंग प्राप्त झाला असून, वडराई खाडीत हजारोंच्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील आसपासच्या परिसरातील समुद्र आणि खाडीतील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात अटी-शर्तींसह कारखाने व उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. जवळपास दोन महिन्यांपासून शुद्ध व निर्मळपणे वाहत असलेल्या नदी-नाल्यांच्या पाण्यामध्ये कारखान्यातून निघणारे रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पालघर बिडको औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधून रसायनमिश्रित सांडपाणी पाणेरी नदीत सोडण्यात आल्याने पाण्याला रासायनिक रंग प्राप्त झाला आहे. तसेच पाणेरी नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळतेे, त्या वडराई खाडीत हजारोंच्या संख्येने मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून येत आहे.
पाणेरी नदी प्रदूषणाचा फटका; वडराई खाडीत आढळले हजारो मृत मासे - वडराई खाडी मृत मासे
अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात अटी-शर्तींसह कारखाने व उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. जवळपास दोन महिन्यांपासून शुद्ध व निर्मळपणे वाहत असलेल्या नदी-नाल्यांच्या पाण्यामध्ये कारखान्यातून निघणारे रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पाणेरी नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळतेे, त्या वडराई खाडीत हजारोंच्या संख्येने मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून येत आहे.