पालघर - जिल्ह्य़ातील वाडा शहरातील कृषी कार्यालयासमोरच्या विहिरीत चेतन रसिक मनोरे (वय 27 वर्षे, रा. वाडा) या युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. हा मृतदेह सडल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर वाडा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारी (दि. 26 फेब्रुवारी) सायंकाळी 4 च्या सुमारास जागेवरच शवविच्छेदन केले. त्याच्या जवळील आधारकार्डवरून त्याची ओळख पटली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाणे अधिक करीत आहेत.
हेही वाचा - पालघरमधील पडघा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कारण अस्पष्ट