ETV Bharat / state

वीज दरवाढीच्या निषेधार्थ ग्राहकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - वीज दरवाढ

वीज दरवाढ न परवडणारी आहे. त्याचबरोबर उद्योगांसाठी हानिकारक व राज्याच्या विकासाला खीळ घालणारी आहे. त्यामुळे वीज ग्राहक, शेतकरी, औद्योगिक क्षेत्रात असंतोष निर्माण झाला आहे.

वीज दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करताना ग्राहक
author img

By

Published : Feb 12, 2019, 5:30 PM IST

पालघर - जिल्हा महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेच्यावतीने आज वाढत्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच संतप्त ग्राहकांकडून वीज बिलांची होळी करण्यात आली.

महावितरणने सप्टेंबर २०१८ मध्ये निश्‍चित केलेले औद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेत जवळपास २० टक्क्यांनी जास्त आहेत. घरगुती, व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांचे वीजदरही देशातील सर्वाधिक वीजदर पातळीवर पोहोचले आहेत. सप्टेंबर २०१८ च्या आदेशानुसार २० हजार ६५१ कोटी रूपये १५ टक्के सरासरी दरवाढ लादली आहे. त्यापैकी ६ टक्के म्हणजे ८ हजार २६८ कोटी रूपये ग्राहकांकडून मार्च २०२० पर्यंत वसूल केले जाणार आहेत. उर्वरीत ९ टक्के म्हणजे १२ हजार ३८२ कोटी रूपये नियामक मत्ता आकार म्हणून एप्रिल २०२० पासून पुढे व्याजासह सर्व ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहेत.

ही दरवाढ न परवडणारी आहे. त्याचबरोबर उद्योगांसाठी हानिकारक व राज्याच्या विकासाला खीळ घालणारी आहे. त्यामुळे वीज ग्राहक, शेतकरी, औद्योगिक क्षेत्रात असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी वीज दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार २०१६ ला निश्चित केलेले २०१८ मधील वीज दर मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावे. तसेच त्यासाठी ३ हजार ४०० कोटी अनुदान मंजूर करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

undefined

राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी व सत्तेवर आल्यापासून गेल्या ५० महिन्यांत राज्यातील सर्व वीजग्राहक जनतेस “वीज दर कमी करू व अन्य राज्यांच्या पातळीवर आणू’’ असे जाहीर आश्‍वासन दिलेले होते. तथापि अद्याप या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही, या आश्वासनाची पूर्तता राज्य शासनाने करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी वीज ग्राहक संघटना पालघर जिल्ह्याध्यक्ष प्रकाश लवेकर, निखील मेस्त्री व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Intro:वीज दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज ग्राहक संघटनेने केली वीज बिलांची होळीBody: वीज दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज ग्राहक संघटनेने केली वीज बिलांची होळी

नामित पाटील,
पालघर,दि.

पालघर जिल्हा महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेतर्फे वाढत्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. तसेच वीज बिलांची होळी करण्यात आली.

वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार 2016 रोजी निश्चित केलेले 2018 मधील वीज दर मार्च 2020 पर्यंत कायम ठेवावेत. तसेच त्यासाठी 3400 कोटी अनुदान मंजूर करावे. आदी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध संघटना व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेतर्फे आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. वाढत्या वीज दरवाढीमुळे वीज ग्राहक, शेतकरी, औद्योगिक क्षेत्रातील असंतोष आहे, त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून वीज बिलांची होळी यावेळी करण्यात आली.

महावितरणचे आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये निश्‍चित केलेले औद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेने २०% ते ३५% नी जास्त आहेत. घरगुती, व्यापारी व शेतकरी ग्राहकांचे वीजदरही देशातील सर्वाधिक वीजदर पातळीवर पोहोचले आहेत. आयोगाने सप्टेंबर २०१८ च्या आदेशानुसार २०६५१ कोटी रू. म्हणजे १५% सरासरी दरवाढ लादली आहे. त्यापैकी ६% म्हणजे ८२६८ कोटी रू. ग्राहकांकडून मार्च २०२० पर्यंत वसूल केले जाणार आहेत. उर्वरीत ९% म्हणजे १२३८२ कोटी रू. नियामक मत्ता आकार म्हणून एप्रिल २०२० पासून पुढे व्याजासह सर्व ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहेत. ही दरवाढ न परवडणारा प्रचंड बोजा लादणारी आहे. त्याच बरोबर उद्योगांसाठी हानिकारक व राज्याच्या विकासाला खीळ घालणारी आहे.

राज्य सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी व सत्तेवर आल्यापासून गेल्या ५० महिन्यांत राज्यातील सर्व वीजग्राहक जनतेस “वीज दर कमी करू व अन्य राज्यांच्या पातळीवर आणू’’ असे जाहीर आश्‍वासन दिलेले होते. तथापि अद्याप या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही, या आश्वासनाची पूर्तता राज्य शासनाने करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी वीज ग्राहक संघटना पालघर जिल्ह्यध्यक्ष प्रकाश लवेकर, निखील मेस्त्री व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

प्रमुख मागण्या:-

१) मा. आयोगाने नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार निश्‍चित केलेले औद्योगिक वीजदर मार्च २०२० पर्यंत कायम ठेवणेत यावेत. राज्य सरकारने स्वत: दिलेल्या जाहीर आश्‍वासनाप्रमाणे वीजदर शेजारील राज्यांच्या समपातळीवर येईपर्यंत कोणतीही दरवाढ करू नये व त्यासाठी आवश्यक त्या सर्व कठोर उपाययोजना कराव्यात.

२) मागील सत्तारुढ सरकारने तत्कालीन दरवाढ रद्द करण्यासाठी व वीज दर स्थिर ठेवण्यासाठी जानेवारी २०१४ पासून दरमहा ६०० कोटी रू. अनुदान महावितरण कंपनीस १० महीने दिले होते. आता निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत औद्योगिक वीज दर स्थिर ठेवण्यासाठी सध्या दरमहा १५० कोटी रू. व मार्च २०१९ पासून दरमहा २०० कोटी रू. याप्रमाणे एकूण १९ महिन्यांसाठी एकूण ३४०० कोटी रू. अनुदान द्यावे लागेल. उद्योगांच्या व राज्याच्या हिताच्या व विकासाच्या दृष्टीने राज्य सरकारने तेवढे अनुदान मंजूर करावे.

३) महानिर्मितीमधील अकार्यक्षमता व अवाढव्य उत्पादन खर्च यामुळे महानिर्मिती तसेच रतन इंडिया इ. च्या वीजखरेदीसाठी अंदाजे प्रति युनिट १.०० रू. जादा द्यावा लागत आहे. त्याचा वीज दरवाढीतील परीणाम प्रति युनिट ०.५० रू. आहे. महानिर्मितीची कार्यक्षमता व सरासरी संयंत्र भारांक (P.L.F) ८०% होण्यासाठी व उत्पादन खर्च कमी होण्यासाठी कठोर उपाययोजना करावी व ग्राहकांवरील हा वाढीव बोजा पूर्णपणे रद्द करावा.

४) महावितरणची खरी वितरण गळती (Distribution Losses) किमान ३०% वा अधिक आहे. या अतिरिक्त गळतीचा ग्राहकांवरील अतिरिक्त बोजा प्रति युनिट १.०० रू. आहे. खरी वितरण गळती १२% या मर्यादेत आणण्यासाठी कठोर उपाययोजना करावी.

५) राज्य सरकारने स्थापन केलेल्या “कृषिपंप वीज वापर सत्यशोधन समिती’’ चा अहवाल व संबंधित “आय. आय. टी. मुंबई’’ यांचा अहवाल जाहीर व मंजूर करणेत यावा. आय. आय. टी. मुंबई यांच्या अहवालानुसार वीज वापर व वितरण गळती निश्‍चित करणेत यावी. त्या नुसार शेती पंप वीज बिले दुरुस्त करण्यात यावीत व त्या आधारे नवीन “कृषि संजीवनी” योजना जाहीर करण्यात यावी. तसेच शेतीपंपाचे नवीन सवलतीचे वीजदर निश्‍चित व जाहीर करणेत यावेत.

६) महानिर्मिती व महावितरण या दोन्ही कंपन्यामधील प्रशासकीय व देखभाल व दुरुस्ती खर्च (O.& M.) हा खाजगी कंपन्यांच्या तुलनेने दीडपट वा अधिक आहे. सरासरी वीज पुरवठा खर्च खाली आणण्यासाठी या खर्चावर नियंत्रण आणावे.

७) महावितरण कंपनीकडे २४X७ वीज उपलब्ध असतानाही केवळ ट्रान्सफॉर्मर फेल्युअर, ब्रेकडाउन, तारा तुटणे, खांब पडणे, व्होल्टेज प्रॉब्लेम इ. विविध स्थानिक कारणामुळे दररोजचे वीज खंडीत होण्याचे प्रमाण सरासरी २ तास आहे. त्यामुळे कंपनीची महसूली घट वार्षिक ६००० कोटी रू. आहे. ग्राहकांचे नुकसान चौपट वा अधिक आहे. राज्य शासनाचेही महसूली नुकसान होत आहे. हे सर्व नुकसान कायमचे थांबावे यासाठी योग्य ती कठोर उपाय योजना तातडीने करणेत यावी.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.