ETV Bharat / state

कोरोना संकट : माकपचे आमदार विनोद निकोले यांची आमदार निधीतून १० लाखांची मदत - डहाणू पालघर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रात कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि इतर डाव्या पक्षांच्या पश्चिम बंगालमधील सर्व आमदारांनी प्रत्येकी १० लाख रुपये रक्कम आपल्या मतदार संघातील आरोग्य व्यवस्थेसाठी दिली आहे. त्याच धर्तीवर आमदार निकलो यांनी सुद्धा डहाणू विधानसभा मतदार संघात आरोग्य सोयी आणि सुविधा सुधारण्यासाठी आमदार निधीतून १० लाख दिले.

CPIM mla vinod nikole  CPIM mla vinod nikole help  health services in dahanu palghar  dahanu palghar  डहाणू पालघर  कोरोना अपडेट
कोरोना संकट : माकपचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांची आमदार निधीतून १० लाखांची मदत
author img

By

Published : Mar 27, 2020, 12:43 PM IST

पालघर - कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात हाहाकार माजवला आहे. मात्र, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आता लोकप्रतिनिधीही पुढे सरसावताना दिसत आहेत. डहाणू विधानसभा मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी आपल्या मतदारसंघातील आरोग्य सोयी आणि सुविधेसाठी आमदार निधीतून १० लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले. याबाबतचे पत्र त्यांनी ईमेलद्वारे लिहून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रात कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि इतर डाव्या पक्षांच्या पश्चिम बंगालमधील सर्व आमदारांनी प्रत्येकी १० लाख रुपये रक्कम आपल्या मतदार संघातील आरोग्य व्यवस्थेसाठी दिली आहे. त्याच धर्तीवर आमदार निकलो यांनी सुद्धा डहाणू विधानसभा मतदार संघात आरोग्य सोयी आणि सुविधा सुधारण्यासाठी आमदार निधीतून १० लाख दिले. जेणेकरून मतदार संघात आरोग्य सुविधा आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जलद मदत व सुधारणा होऊ शकेल, असे आमदार विनोद निकोले यांनी सांगितले आहे. पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केल्याचे आमदार निकोले म्हणाले.

कोरोनाशी लढण्यासाठी देशभरात करण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय योग्य आहे. मात्र, लाखो असंघटित कामगार, शेतमजूर व शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. त्या सर्वांना ५ हजार रुपयाची रक्कम आणि एक महिन्याचे मोफत धान्य सरकारने तातडीने द्यावे, अशी मागणीही आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.