ETV Bharat / state

शरद पवारांकडून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते राजेश पारेख यांच्या कुटुंबियांच सांत्वन - माजी नगराध्यक्ष राजेश पारेख यांचे अकस्मात निधन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डहाणू तालुक्यातील नेते माजी नगराध्यक्ष राजेश पारेख यांचे काही दिवसांपूर्वी अकस्मात निधन झाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी डहाणू येथे पारेख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून श्रद्धांजली वाहिली.

Consolation to Rajesh Parekh's family from Sharad Pawar
शरद पवारांकडून राजेश पारेख यांच्या कुटुंबियांच सांत्वन
author img

By

Published : Oct 11, 2020, 3:03 PM IST

पालघर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डहाणू तालुक्यातील नेते माजी नगराध्यक्ष राजेश पारेख यांचे काही दिवसांपूर्वी अकस्मात निधन झाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डहाणू येथे पारेख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. राजेश पारेख यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी ट्विट करत व्यक्त केली आहे.

डहाणू येथीलच राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश कर्णावत आणि मुकुंद चव्हाण यांचे देखील या काळात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेत शरद पवारांनी सांत्वन केले.

  • डहाणूचे माजी नगराध्यक्ष राजेश पारेख यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता हरपला. आज त्यांच्या घरी जाऊन दिवंगत राजेश पारेख यांच्या स्मृतींचे स्मरण केले व कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. pic.twitter.com/6bp0LMRnny

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) October 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
राजेश पारेख यांनी डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक व पुढे नगराध्यक्ष पद भूषविले. डहाणू रोड जनता सहकारी बँकेचे संचालक व सध्या चेअरमन म्हणून ते काम पाहत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डहाणू- तलासरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष म्हणून ते अलीकडे काम पाहत होते. विशेषतः डहाणू नगरपरिषद व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून निघून गेले. मात्र राजेश पारेख यांनी पक्ष तगवून धरला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.