पालघर - देशात इंधन दर सतत वाढत आहेत. यामुळे महागाई वाढत आहे. या दरवाढीच्या विरोधात मोदी सरकारच्या निषेधार्थ काँग्रेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पालघरमधील प्रतिभा पेट्रोल पंप समोर कोरोना नियम पाळून आंदोलन करत, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्य पार्लमेंटरी कमिटी सदस्य पराग पष्टे यांच्या नेतृत्वाखाली झाले.
आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात राज्यव्यापी आंदोलन काँग्रेसतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पालघरमध्येही काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले व केंद्र सरकारने ही दरवाढ लवकरात लवकर मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा - कोरोनाशी झुंज देत असलेल्या त्या नवजात बालकाचा मृत्यू