वसई: वसईच्या तहसीलदार कार्यालयात (Vasai Tahsil) आज ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजनी चालू आहे. या मतमोजणी दरम्यान निवडणुकीतील उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला. (conflict at vasai Tehsil).
सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व उमेदवारांना पोलिसांनी ओळखपत्रावरून मतमोजणी केंद्रावर प्रवेश नाकारल्याने त्यांनी तहसीलदार कार्यालयात गोंधळ घातला. संतप्त उमेदवारांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा विरोधात संताप व्यक्त केला. प्रशासनाने ओळखपत्रासाठी आधी सूचना दिली नव्हती, असं माजी खासदार बळीराम जाधव व भाजपचे पदाधिकारी राजू म्हात्रे सांगितले. जवळपास 20 मिनिटे तहसील कार्यालयाच्या दारातच हा गोंधळ सुरु होता. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी स्वतः तहसीलदार उज्वला भगत यांनी मध्यस्ती केली व त्यानंतर उमेदवारंसह त्यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रावर प्रवेश दिला.