ETV Bharat / state

Cobra Commando Ramdas Bhogade : '..मला रस्ता बनवून मिळेल का?', कोब्रा कमांडोचे मुख्यमंत्र्यांना साकडे

author img

By

Published : Jul 19, 2022, 2:34 PM IST

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे मला रस्ता बनवून देतील का? असे साकडे कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. दोन्ही पाय गमावलेले कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांना खडतर प्रवास करावा लागतो आहे. दोन्ही पाय गमवावे लागल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Cobra Commando Ramdas Bhogade
कोब्रा कमांडो रामदास भोगाडे

पालघर - पालघर जिल्ह्यातील ( Palghar District ) जव्हार तालुक्याच्या ( Jawhar Taluka ) रातोना गावात राहणारे कोब्रा कमांडो रामदास भोगाडे ( Cobra Commando Ramdas Bhogade ) यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गावातील रस्ता बनवून देण्याचे साकडे घातले आहे. रामदास भोगाडे हे विकलांग आहेत. 29 नोव्हेंबर 2017 रोजी छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात ते धैर्याने लढले. परंतू दुर्दैवाने बॉम्बस्फोटात ( Injured In Sukma Bomb blast ) ते गंभीर रित्या जखमी झाले. यात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोब्रा कमांडो रामदास भोगाडे

रस्त्यांकडे सरकराचे दुर्लक्ष - याबाबत सविस्तर वृत्त असे की पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वडोली रातोना गावातील कोब्रा कमांडो रामदास भोगाडे ह्या दोन्ही पायांनी विकलांग असलेल्या कमांडोला गावातील रस्त्या अभावी चिखल व मातीतून कृत्रिम पायाने चालत जावे लागते. आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी वडोली रातोना गावातील रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने गावातील रस्त्याअभावी कोब्रा कमांडोला असाच सामना करावा लागत आहे. त्यांच्या घरापासून जवळपास १५० मीटर रस्ता केवळ पायवाट आहे. पाण्यातून तसेच शेताच्या बांधावरून त्यांना पायी खडतर प्रवास करावा लागतो.

कृत्रिम पायांचा वापर - कोब्रा कमांडो रामदास भोगाडे हे 29 नोव्हेंबर 2017 रोजी छत्तीसगड राज्यात सुकमा येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात धैर्याने लढले परंतु दुर्दैवाने बॉम्बस्फोटात ते जखमी होऊन दोन्ही पायाने विकलांग झाले होते. सध्या ते पुणे ग्रुप सेंटर ( Pune Group Center ) येथे सैन्यात कार्यरत असून ते आपल्या गावाकडे वडोली रातोनापाडा ( Vadoli Ratonapada village ) येथे सुट्टी असलेकी ये-जा करतात परंतू त्यांना काही कामांकरिता घराबाहेर जायचे झाल्यास त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखल माती असून तेथून जाण्यासाठी शेताच्या बांधावरून पायवाट काढत ‌चालत जावे लागते. दोन्ही पाय गमवावे लागल्याने प्लास्टिकच्या कृत्रिम पायांवर ( artificial leg ) चिखल मातीचा रस्ता तुडवत चालत जावे लागते. अनेक वेळा त्यांची पत्नी त्यांना पाठीवर घेऊन पाण्यातून वाट काढते.

स्थानिक पुढाऱ्यांचे दुर्लक्ष - कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जागेची मालकी एका खाजगी मालकाची असल्याने त्याने रस्ता बंद केला आहे. त्यांची गाडी घरापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. सदरील कमांडोच्या घरापर्यंत रस्ता बनवून झाला तर त्यांची घरापर्यंत येण्या जाण्याची समस्या दूर होऊ शकते. परंतू या रस्ता समस्यांकडे कोणताही स्थानिक पुढारी लक्ष देत नसल्याने. अनेक वर्षापासून या रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे. सदर रस्त्याची पाहणी विक्रमगड विधानसभेच्या तत्कालीन आमदारांनी केली होती. त्यानंतर कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून रस्ता करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, त्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही.

मोठी शोकांतिका - एक आदिवासी भागातील जवान आपल्या आयुष्यातील बारा वर्षे देशसेवा करतो. देशसेवा करत असताना त्यांचे दोन्ही पाय ते गमावतात. असे असताना देखील त्यांच्या नशिबी घरी आल्यावर त्यांना घरी जाण्यासाठी सरकारकडून साधा पक्का रस्त्याची सोय होऊ शकत नाही. ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. याबाबत कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांची प्रतिक्रिया घेतली. त्यात त्यांनी सांगितले माझ्या गावात रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे मला रस्त्यावरून बाहेर पडण्यासाठी माझी मोठी गैरसह होत आहे. रस्ता आणि घर यामध्ये छोटासा नाला असल्यामुळे त्या नाल्याला पाणी आल्यामुळे मी घरापर्यंत पोहचू शकत नाही. मी दोन्ही पायाने विकलांग असल्याने अशा मी पायी चालू शकत नाही, कधी कधी माझी पत्नी मला पाठीवरून घेऊन प्रवास करते. सध्या पालघर जिल्ह्यात जास्त पाऊस असल्यामुळे व रस्त्यावर चिखल- पाणी असल्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. रस्त्या अभावी माझी मोठी गैरसोय होत आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मला रस्ता बनवून देतील का? असे साकडे कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांनी मुख्यमंत्र्याकडे घातले आहे.

हेही वाचा - Shiv Sena MP rebellion: खासदारांच्या बंडखोरीची कल्पना उद्धव ठाकरेंना होती - विनायक राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.