ETV Bharat / state

रत्यावरील छोट्या पुलाचे काम अंदाजपत्रक नुसार करावे - ग्रामस्थ - पालघर जिल्हा बातमी

पालघर जिल्ह्यातील वाडा ते गारगाव या रस्त्यावरील छोट्या पुलाचे काम अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पूल
पूल
author img

By

Published : Jan 14, 2021, 4:32 PM IST

Updated : Jan 14, 2021, 4:40 PM IST

पालघर - जिल्ह्यातील वाडा ते गारगांव या रस्त्यावरील केलेल्या छोट्या पुलाचे काम अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

बोलताना ग्रामस्थ

वाडा तालुक्यातील गारगांव हे अतिदुर्गम भागातील गाव आहे. ग्रामीण भागातील जनतेचा रेटा हा तालुक्याच्या ठिकाणी असतो. गारगांव गावाला जोडणारा रस्ता हा खड्डेमय झाला आहे. यातच रस्त्यावरील लहान मोऱ्यांची (पुलांची) दुरवस्था पहावयास मिळते. दुरुस्ती केली तर थातूर-मातूर करत ती तग धरत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कठडे बांधले नाहीत पाईप खाली काँक्रिट बांधकाम नाही

वाडा गारगांव या रस्त्याच्या ठिकाणी एका मोरीचे काम चालू आहे हे काम सुस्थितीत नाही. नवीन टाकलेले पाईप आत फुटलेले आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाह वाहून जाण्यासाठी मोरीत टाकलेले सिमेंट पाईप तुटलेले आहेत. पाईप खाली आणि कुठलेही काँक्रिट केले नाही. भविष्यात हे अवजड वाहनांच्या रहदारीने पाईप फुटून ही मोरी वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोरीच्या साइडला कठडे बांधण्यात आले नाहीत, असे आरोप येथील ग्रामस्थ हितेश पाटील यांच्याकडून केला जात आहे.

हेही वाचा - पालघर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस दाखल

हेही वाचा - कुंटनखान्याच्या दलदलीतून पंश्चिम बंगालमधील तरुणीची सुटका

Last Updated : Jan 14, 2021, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.