ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोट; 5 कामगार जखमी

घटना घडली तेव्हा कंपनीत 35 कामगार काम करत होते. स्फोटात 5 कामगार जखमी झाले व त्यांना बोईसर येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

http://10.10.50.85//maharashtra/04-July-2021/mh-pal-01-blastinchemicalplant-vis-mh10044_04072021105948_0407f_1625376588_433.jpg

author img

By

Published : Jul 4, 2021, 12:51 PM IST

Updated : Jul 4, 2021, 2:20 PM IST

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स कंपनीत स्फोट झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत पाच कामगार जखमी झाले असून त्यांना बोईसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एका कामगाराला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोट

केमिकल कंपनीत स्फोट
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील झोन एल -30 येथे असलेल्या भारत केमिकल्स या कंपनीत केमिकल युनिटच्या एअर हँडलिंग युनिटमध्ये (एएचयू) शनिवारी रात्री उशिरा स्फोट झाला व आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवले.

पाच कामगार जखमी एकाला डिस्चार्ज
घटना घडली तेव्हा कंपनीत 35 कामगार काम करत होते. स्फोटात 5 कामगार जखमी झाले व त्यांना बोईसर येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एका कामगाराला प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक (डीआयएसएच) वसईचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करणार आहेत.

Last Updated : Jul 4, 2021, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.