ETV Bharat / state

विरोधकांच्या भीतीमुळे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे - चंद्रकांत पाटील

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पाच जुलैपासून सुरू होणार आहे. कोरोनाचे संकट आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. राज्य विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

author img

By

Published : Jun 22, 2021, 10:23 PM IST

चंद्रकांत पाटील यांचा पालघर दौरा
चंद्रकांत पाटील यांचा पालघर दौरा

पालघर - विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पाच जुलैपासून सुरू होणार आहे. कोरोनाचे संकट आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. राज्य विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांच्या भीतीमुळे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे ठेवले असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.

चंद्रकांत पाटील आज पालघर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोरोना काळात मृत्यू झालेल्या पालघर जिल्ह्यातील 37 भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेत पालघर जिल्ह्यातील 37 भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी जीव गमावला असून, ही भाजपासाठी न भरून निघणारी हाणी असल्याच्या भावाना यावेळी पाटलांनी व्यक्त केल्या.

विरोधकांच्या भीतीमुळे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे

विरोधकांच्या भीतीमुळे अधिवेशन दोन दिवसांचे

दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेणार असाल तर अधिवेशन घेता तरी कशाला? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. विरोधक अधिवेशनात विविध प्रश्नांवर घेरतील, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत, त्यासाठी पळवाट म्हणून अधिवेशन दोन दिवसांचे ठेवण्यात आल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दरम्यान एका मंडळातील नगरसेवकांमध्ये नाराजी असली म्हणून फारसा फरक पडत नाही. तेथील नेते या प्रश्नाकडे लक्ष घालतील अशी प्रतिक्रिया मीरा- भाईंदर येथील नगरसेवकांच्या नाराजीवर चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून.. कोरोनामुळे केवळ दोनच दिवस कामकाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.