ETV Bharat / state

वसईत दे दणादण! नवरा-बायकोच्या कुटुंबीयांची फ्री-स्टाईल हाणामारी - cctv vasai in palghar

पतीपासून विभक्त झालेल्या पत्नीच्या घरच्यांना सासरच्यांनी सोसायटीत घुसून फ्री स्टाईल हाणामारी करण्यात आली आहे.यात चार जण जखमी झाले आहेत.

vasai
नवरा-बायकोच्या कुटुंबीयांची फ्री-स्टाईल हाणामारी
author img

By

Published : Feb 25, 2020, 10:33 PM IST

Updated : Feb 25, 2020, 11:09 PM IST

पालघर - पतीपासून विभक्त झालेल्या पत्नीच्या घरच्यांना सासरच्यांनी सोसायटीत घुसून फ्री स्टाईल हाणामारी करण्यात केल्याची घटना घडली. यात चार जण जखमी झाले असून दोन जणांवर वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात दोघांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

मारहाणीचा सीसीटीव्ही

वसई पश्चिमेकडे डीमार्टजवळ असलेल्या पेरियार सोसायटीत सुप्रिया दोन मुलांसह राहते. सुप्रिया जैस्वाल पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादामुळे आपल्या आई वडिलांकडे राहत होती. सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सुप्रिया यांचे पती आणि त्यांच्या सासरकडील मंडळी तिच्या वडिलांच्या घरी आले. त्यानंतर सुप्रिया आणि त्यांच्या भावांना सासरच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केली असून ती मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नवरा-बायकोच्या कुटुंबीयांची फ्री-स्टाईल हाणामारी

सुप्रिया यांच्यासह त्यांचे दोन भाऊ व वडील हाणामारीत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. घरात घुसून ही मारामारी होतानाचा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने काहीवेळ सोसायटीच्या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी वसई पोलिसांनी दोघांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Feb 25, 2020, 11:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.