पालघर - जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना परवानगी न घेता आरोग्य शिबिर घेणाऱ्या दर्शिल होमिओपॅथी क्लिनिक आणि त्रिमूर्ती रोडवेजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून पालघर जिल्ह्यासह राज्यात, देशभरात ठिकठिकाणी जमावबंदीचे आदेश प्रशासनामार्फत लागू करण्यात आले आहेत. मात्र, हे आदेश डावलून डहाणू येथील दर्शिल होमिओपॅथी क्लिनिक आणि त्रिमूर्ती रोडवेज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता करण्यात आल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - जिल्ह्यात १७८ प्रवासी निरीक्षणाखाली; २ प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी, ३३ प्रवाशांचा निरीक्षण कालावधी पूर्ण
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत या आरोग्य शिबिर भरवण्यात आले होते. त्यामुळे या आरोग्य शिबिराचे आयोजन करणाऱ्या दर्शिल होमिओपॅथी क्लिनिक आणि त्रिमूर्ती रोडवेज विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - VIDEO : पैशाच्या वादातून बेकरी कामगाराची गळा चिरुन हत्या