ETV Bharat / state

वाढवण किनारपट्टीवर तांत्रिक बिघाडामुळे अडकले जहाज

मुंबईकडून सुरतकडे रवाना होणारे जहाज तांत्रिक बिघाडामुळे रस्ता भरकटून वाढवण किनारपट्टीवर अडकून पडले आहे. किनाऱ्यालगत खडकाळ भाग असल्याने जहाजाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाढवण किनारपट्टीवर तांत्रिक बिघाडामुळे एक मालवाहू जहाज अडकले आहे
author img

By

Published : Aug 3, 2019, 6:58 PM IST

पालघर - जिल्ह्यातील वाढवण किनारपट्टीवर एक मालवाहू जहाज आल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. हे जहाज कुठून आले याबाबत वाणगाव पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली.

वाढवण किनारपट्टीवर तांत्रिक बिघाडामुळे एक मालवाहू जहाज अडकले आहे
संबधित जहाज सुरतकडून मुंबईकडे वाहतूक करण्यासाठी निघाले होते. मुंबईतील बंदरात सामान उतरवल्यानंतर पुन्हा सुरतकडे रवाना होण्यासाठी निघाले होते. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास समुद्रात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने हे जहाज मार्ग भरकटून वाढवण किनाऱ्यावर आले. किनाऱ्यालगत खडकाळ भाग असल्याने जहाजाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्राला ओहटी लागली असल्यामुळे पाणी ओसरल्यानंतर ते खडकामध्ये अडकले. जहाजाच्या ट्रॉलरमध्ये एक कर्मचारी असून( मुंबई-घाटकोपर) त्याने सुरत येथील कार्यालयात संपर्क साधून सर्व माहिती दिली आहे. सुरतवरून ट्रोलरच्या मदतीसाठी दुसरी बोट रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.

Intro:वाढवण किनारपट्टीवर जहाज तांत्रिक बिघाडामुळे समुद्रकिनारी अडकले
Body: वाढवण किनारपट्टीवर जहाज तांत्रिक बिघाडामुळे समुद्रकिनारी अडकले

नमित पाटील,
पालघर, दि.3/8/2019

पालघर जिल्ह्यातील वाढवण किनारपट्टी भागात एक मालवाहू जहाज भरकटून समुद्रकिनाऱ्यावर आल्याने गावात ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. ह जहाज कुठून आले हे कोणालाच ठाऊक नसल्याने वाणगाव पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता हे जहाज सुरतहुन मुंबईकडे वाहतूक करण्यासाठी निघाले होते, मुंबईतील बंदरात त्यातील सामान उतरवल्यावर पुन्हा सुरतकडे रवाना झाले. रात्री तीन वाजेच्या सुमारास समुद्रात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने हे जहाज मार्ग भरकटून वाढवण किनाऱ्यावर आले. खडकाळ भाग असल्याने त्याला काही प्रमाणात नुकसान सुद्धा झाल्याने ते पुढे जाऊ शकले नाही तसेच समुद्राला नेमकी ओहटी लागली असल्यामुळे पाणी ओसरले व ते खडकामध्ये अडकले.

ट्रॉलर मध्ये एक कर्मचारी असून( मुंबई-घाटकोपर) त्याने सुरत येथील कार्यालयात संपर्क साधून सर्व माहिती दिली आहे व सुरत हुन ट्रोलरच्या मदतीसाठी दुसरी बोट सुद्धा रवाना झाल्याचे समजते

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.