पालघर - चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तलावात बुडाल्याची घटना डहाणू-चिंचणी या प्रमुख राज्य मार्गावर धाकटी डहाणू येथील गणेश मंदिराजवळ घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.
हेही वाचा - विरारमध्ये रेती माफियांची मुजोरी; पालघर पोलीस अधीक्षकांवर केला हल्ला
या अपघातात तलावाच्या घाटावर कपडे धुणाऱ्या तीन महिला जखमी झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेऊन बुडालेल्या कार चालकाला आणि त्यानंतर दोरखंडाच्या सहाय्याने कारही बाहेर काढली. कारचालकासह चारही जखमींना डहाणूतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या सर्वांना प्राथमिक उपचाराअंती घरी सोडण्यात आले.