पालघर - मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेस नजीक वैतरणा नदीवरील पुलाच्या कठड्याला इनोव्हा कार धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, ओवेज लुलानीया (वय 22) असे मृत चालकाचे नाव आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ओवेज हा गुजरातच्या दिशेने जात होता. यावेळी दुर्वेस नजीक वैतरणा नदीवरील पुलाच्या कठड्याला इनोव्हा कार धडकून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघातानंतर तो कारमध्येच अडकून पडला होता. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कार चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ओवेज लुलानिया हा पालघर येथील रहिवासी आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पुलाच्या कठड्यावर इनोव्हा आदळली; कारचालक ठार - update accident news in palghar
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ओवेेेज हागुजरातच्या दिशेने जात होता. यावेळी दुर्वेस नजीक वैतरणा नदीवरील पुलाच्या कठड्याला इनोव्हा कार धडकून भीषण अपघात झाला.