ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षांविरोधात भाजपचे आंदोलन

author img

By

Published : Dec 30, 2020, 3:45 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षांवर महिला अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी राष्ट्रवादीचा निषेध करण्यासाठी पालघर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने बोईसरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री अपयशी ठरत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला.

BJP's agitation in palghar
राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षांविरोधात भाजपचे आंदोलन

पालघर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षांवर महिला अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी राष्ट्रवादीचा निषेध करण्यासाठी पालघर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने बोईसरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री अपयशी ठरत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला. भाजप युवा मोर्चा पालघर जिल्हाध्यक्ष समीर पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षांवर महिला अत्याचाराचा गुन्हा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद येथील एका तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून, तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भाजयुमोचे आंदोलन व कारवाईची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षांवर महिला अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी राष्ट्रवादीचा निषेध करण्यासाठी पालघर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने बोईसरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.