ETV Bharat / state

Shraddha Walkar Murder Case: किरीट सौमय्यांनी घेतली श्रद्धा वालकरच्या कुटुंबीयांची भेट

भाजप नेते किरीट सौमय्यांनी (BJP leader Kirit Soumaya) घेतली श्रद्धा वालकरच्या कुटुंबीयांची भेट. खटला फास्ट ट्रॅकवर चालवून शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं.

Shraddha Walkar Murder Case
भाजप नेते किरीट सौमय्यांनी घेतली श्रद्धा वालकरच्या कुटुंबीयांची भेट
author img

By

Published : Nov 21, 2022, 6:37 PM IST

वसई: दिल्लीत हत्या झालेल्या भाजप नेते किरीट सौमय्यांनी (BJP leader Kirit Soumaya) घेतली श्रद्धा वालकरच्या कुटुंबीयांची भेट (met Shraddha Walkers family). खटला फास्ट ट्रॅकवर चालवून शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं. आज दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास सौमय्या हे वसईतील संस्कृती बिल्डिंग मधील श्रद्धाच्या घरी आले होते. यावेळी श्रद्धाचे वडिल व तिच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली.

भाजप नेते किरीट सौमय्यांनी घेतली श्रद्धा वालकरच्या कुटुंबीयांची भेट

मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस दलाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, सोबत दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्याशी श्रद्धाच्या कुटुंबियांची बातचीत करून दिल्याचे सौमय्या यांनी सांगितले. श्रद्धाच्या हत्येमागे आणखी कोणी आहे का? या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्यावरही प्रशासनाने योग्य कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी माध्यमांसमोर केली

काय आहे प्रकरण- आई-वडिलांच्या आज्ञेत न राहता स्वतःच्या मर्जीने लिव्ह इन रिलेशनच्या (Live in Relation) जाळ्यात अडकलेल्या वसईतील श्रद्धाच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून दिल्लीतल्या जंगलात इतरत्र फेकून दिल्याच्या घटनेने दिल्लीसह मुंबई हादरून गेली. दिल्ली पोलिसांनी श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताब अमिन पूनावाला याला माणिकपूर पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या.

हत्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे वसईतील तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील (Dcp Sanjay kumar) यांनी. पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल केला आणि वसईतूनच या तपासाची चक्रे वेगाने फिरली, आणि ती दिल्लीपर्यंत जाऊन धडकली. त्यामुळेच श्रद्धा वालकरच्या क्रूर हत्या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.