ETV Bharat / state

VIDEO : अशेरी गडावर दारू पार्टी करणाऱ्या मद्यपींना स्थानिक दुर्गप्रेमींनी दिला चोप - asheri fort

अशेरीगडाचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहावे व निसर्गसंपन्न अशेरीगडाचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी वनविभागाने या बाबीवर गांभीर्याने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

पालघर
author img

By

Published : Jul 17, 2019, 2:26 PM IST

पालघर - जिल्ह्यातील ऐतिहासिक अशेरीगड मद्यपींच्या तसेच कचरा व आगीच्या विळख्यात सापडला आहे. गडावर धूडगूस घालणाऱ्या अशाच मद्यपींना स्थानिक दुर्गप्रेमींनी चांगलाच धडा शिकवला. अशेरी गडावर दारू पार्टी करणाऱ्या मद्यपी तरुणांना स्थानिकांनी चोप देत, त्यांनी केलेला कचराही उचलायला लावला व गडावरून पिटाळून लावले.

व्हिडिओ - अशेरी गडावर दारू पार्टी करणाऱ्या मद्यपींना स्थानिक दुर्गप्रेमींनी दिला चोप

अशेरीगड हा ऐतिहासिक पाऊलखुणा व निसर्ग सौंदर्य जपणारा पालघर जिह्यातील अत्यंत महत्त्वाचा गड आहे. अलीकडे अशेरीगडावर येणाऱ्या मद्यपी व प्रेमीयुगुलांची संख्या वाढत चालल्याने गडावरील वास्तूंच्या परिसरात व मुख्य पठारावर दारूच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या यांची संख्या वाढत चालली आहे. सध्या गडावरील अनेक भागातील पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणावर व गुहेच्या आवारात बेसुमार दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. तसेच वनविभागाने तयार केलेल्या चिरेबंदी दगडाच्या चौकोनी कचराकुंड्यांत हौशी पर्यटक नियमितपणे आग लावतात तसेच गडाचे विद्रुपीकरण करतात.

Intro:अशेरी गडावर दारू पार्टी करणाऱ्या मद्यपींना स्थानिक दुर्गप्रेमींनी शिकवला धडा; चोप देत लावले पिटाळून
Body:अशेरी गडावर दारू पार्टी करणाऱ्या मद्यपींना स्थानिक दुर्गप्रेमींनी शिकवला धडा; चोप देत लावले पिटाळून

नमित पाटील,
पालघर, दि.17/7/2019

पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक अशेरीगड मद्यपींच्या तसेच कचरा व आगीच्या विळख्यात सापडला असून गडावर धूडगूस घालणाऱ्या अश्याच मद्यपिंना स्थानिक दुर्गप्रेमींनी चांगलाच धडा शिकवला. अशेरी गडावर दारू पार्टी करणाऱ्या मद्यपी तरुणांना स्थानिकांनी चोप देत, त्यांनी केलेला कचराही उचलायला लावला व गडावरून पिटाळून लावले.

अशेरीगड हा ऐतिहासिक पाऊलखुणा व निसर्ग सौंदर्य जपणारा पालघर जिह्यातील अत्यंत महत्त्वाचा गड आहे. अलीकडे अशेरीगडावर येणाऱ्या मद्यपी व प्रेमीयुगुलांची संख्या वाढत चालल्याने गडावरील वास्तूंच्या परिसरात व मुख्य पठारावर दारूच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या यांची संख्या वाढत चालली आहे. सध्या गडावरील अनेक भागातील पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणावर व गुहेच्या आवारात बेसुमार दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. तसेच वनविभागाने तयार केलेल्या चिरेबंदी दगडाच्या चौकोनी कचराकुंड्यांत हौशी पर्यटक नियमितपणे आग लावतात तसेच गडाचे विद्रुपीकरण करतात. अशेरीगडाचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहावे व निसर्गसंपन्न अशेरीगडाचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी वनविभागाने या बाबीवर गांभीर्याने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.