ETV Bharat / state

मिरा-भाईंदर येथील शाळेत बजरंग दलाच्या शिबिरात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण? - police

इथे केवळ तरुणांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केल्याचे सांगितले. यात विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचा काहीही संबंध नाही, तसेच बजरंग दलाच्या बदनामीसाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप संयोजकाच्यावतीने करण्यात आला आहे.

बजरंग दलाच्या शिबिरात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण
author img

By

Published : Jun 3, 2019, 4:46 PM IST

पालघर - मिरा-भाईंदर येथील 'सेव्हन स्क्वेअर' या शाळेत विश्व हिंदू परिषदेंतर्गत बजरंग दलातर्फे कोकण प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात बंदूक आणि रायफल हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

शाळेत बजरंग दलाच्या शिबिरात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण?

मिरा-भाईंदरचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या 'सेव्हन स्क्वेअर' या शाळेत बजरंग दलातर्फे २५ मे ते १ जून या दरम्यान तरुणांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शौर्य प्रशिक्षण वर्गासाठी २९ जिल्ह्यातून १३० विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षण वर्गाचे काही फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. या फोटोमध्ये काही तरुण हातात रायफल आणि बंदूक धरून प्रशिक्षण घेत असल्याचे दिसत आहे.

हा सर्व प्रकार समोर येताच स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते साजिद बादशहा यांनी नवघर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या प्रशिक्षणामध्ये कोणते ट्रेनिंग दिले जात होते, ते फोटो कोणी वायरल केले, ते फोटो कुठले आहेत, याचा तपास नवघर पोलीस करत आहेत. या प्रशिक्षण शिबिरात कोणत्याही प्रकारच्या हत्याराचे ट्रेनिंग दिले गेले नसून, व्हायरल झालेले फोटो इथले नसल्याचा दावा संयोजकाच्यावतीने केला आहे. इथे केवळ तरुणांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केल्याचे सांगितले. यात विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचा काहीही संबंध नाही, तसेच बजरंग दलाच्या बदनामीसाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप संयोजकाच्यावतीने करण्यात आला आहे. मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर, शाळा व्यवस्थापक शाळांना सुट्टी असल्यास सार्वजनिक कार्यक्रमास सशुल्क परवानगी देते. यात आमचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:मिरा- भाईंदर येथील शाळेत बजरंग दलाच्या शिबिरात शास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण ?Body:मिरा- भाईंदर येथील शाळेत बजरंग दलाच्या शिबिरात शास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण ?

नमित पाटील,
पालघर, दि.3/5/2019

मिरा-भाईंदर येथील 'सेव्हन स्क्वेअर' या शाळेत विश्व हिंदू परिषदेअंतर्गत बजरंग दलतर्फे कोकण प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रशिक्षण शिबिरात बंदूक आणि रायफल हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यामुळे सगळीकडे एकाच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची आहे. या प्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

मिरा- भाईंदरचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या 'सेव्हन स्क्वेअर' या शाळेत बजरंग दलातर्फे 25 मे ते 1 जून या कालावधीत तरुणांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शौर्य प्रशिक्षण वर्गासाठी 29 जिल्ह्यांतून 130 विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षण वर्गाचे काही फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. या फोटोमध्ये काही तरुण हातात रायफल आणि बंदूक धरुन प्रशिक्षण घेत असल्याचेेे दिसत आहे.

हा सर्व प्रकार समोर येताच स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते साजिद बादशहा यांनी नवघर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या प्रशिक्षणामध्ये कोणतं ट्रेनिंग दिलं जात होतं, ते फोटो कोणी वायरल केले, ते फोटो कुठले आहेत, याचा तपास नवघर पोलीस करत आहेत.

या प्रशिक्षण शिबिरात कोणत्याही प्रकारच्या हत्याराचं ट्रेनिंग दिले गेले नसून वायरल झालेले फोटो इथले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. इथे केवळ तरुणांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. यात विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचा काहीही संबंध नसल्याचाही दावाही त्यांनी केला आहे तसेच बजरंग दलाच्या बदनामीसाठी हे षडयंत्र रचलेे जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र शाळा व्यवस्थापक शाळांना सुट्टी असल्यास सार्वजनिक कार्यक्रमास सशुल्क परवानगी देते. यात माझा काहीही संबंध नसल्याचे त्यांंनी सांगितले.

Byte:-
1. साजिद बादशाह- स्थानिक कार्यकर्ता सि.पी.एम
2. संदीप रमाकांत भगत- बजरंग दल कोकण प्रांत संयोजक Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.