ETV Bharat / state

विरारमध्ये महिला मॅनेजरची माजी मॅनेजरने चाकूने भोसकून केली हत्या, महिला कॅशिअर जखमी - विरार आयसीआयसीआय बँक लुटणे

विरार पूर्व परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेत गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास लुटीचा प्रकार घडला.

f
icici bank
author img

By

Published : Jul 30, 2021, 1:00 AM IST

Updated : Jul 30, 2021, 1:36 PM IST

पालघर(विरार) - विरार पूर्व परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेत गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास लुटीचा प्रकार घडला. याला विरोध करताना बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मॅनेजर योगीता वर्तक यांचा मृत्यू झाला असून, कॅशियर श्वेता देवरूख जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी कॅशियरवर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वऱहाडे

हेही वाचा - पूरग्रस्तांना अधिकच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणू - देवेंद्र फडणवीस

माजी मॅनेजरचे कृत्य -

संध्याकाळी बँक बंद होण्याच्या सुमारास हा लुटीचा प्रकार घडला. बँकेच्याच माजी मॅनेजरने बँक लुटण्याचा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार घडला त्यावेळी बहुतांश कर्मचारी घरी गेले होते. अनिल दुबे असे त्या माजी मॅनेजरचे नाव आहे. या घटनेनंतर दुबे पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दरम्यान; आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून; गुन्हे दाखल करण्याची प्रकिया सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट - ७,२४२ बाधितांची नोंद, १९० रुग्णांचा मृत्यू

Last Updated : Jul 30, 2021, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.