ETV Bharat / state

Palghar News : डोक्यावर टांगती तलवार घेवून विद्यार्थी घेतात शिक्षणाचे धडे, विराथन बुद्रुक येथील अंगणवाडीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत - टांगती तलवार घेवून विद्यार्थी घेतात शिक्षणाचे धडे

पालघर जिल्ह्यातील विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी गावाशेजारी असलेल्या अंगणवाडीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने विद्यार्थ्या जीव धोक्यात घेवून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. हा धोकादायक स्लॅब कोसळून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण? असा असा सवाल पालकवर्गातून केला जात आहे. (Anganwadi slab will be collapses at virathan Budruk)

Anganwadi slab will be collapses at virathan Budruk
विराथन बुद्रुक येथील अंगणवाडीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत
author img

By

Published : Dec 6, 2022, 3:35 PM IST

पालघर : पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडील विराथन बुद्रुक येथील चाफेवाडी गावाशेजारी असलेली अंगणवाडी वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या कडेला बांधण्यात आली आहे. या अंगणवाडीला कोणतीच संरक्षण भिंत देखील नाही. तसेच पावसाळ्यात या अंगणवाडीत पाणी शिरून लहान मुलांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागते. काही महिन्यापूर्वी या अंगणवाडीच्या छतावरील स्लॅब कोसळून पडला होता. तर अर्धवट पडलेल्या स्लॅबचा उरलेला भाग केव्हाही कोसळून जीवित हानी होऊ शकते. असे असताना देखील या गावातील ग्रामपंचायत, सरपंच, राजकीय व्यक्ती कोणीच लक्ष देत नसल्याचे पालकवर्गातून बोलले जाते. (Anganwadi slab will be collapses at virathan Budruk)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.